आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्ची-परशाची क्रेझ ओसरली? प्रेक्षकच नसल्याने रिंकू-आकाशचा कार्यक्रम चक्क रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरः ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिने रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आर्ची आणि परशाची क्रेझ आता ओसरली की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे गेले कित्येक दिवस ज्या नवोदित कलाकारांना बाऊन्सर शिवाय फिरणं अशक्य होतं अशा आर्ची आणि परशाच्या लातूरच्या एका कार्यक्रमात मात्र प्रेक्षकच नसल्यामुळे आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली.
लातूरच्या क्रीडा संकुलात रविवारी शाळेच्या मदत निधीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ‘सैराट’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकार सहभागी होणार होते. लातूरमधील कार्यक्रमालाही मोठी गर्दी जमेल, अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र, कार्यक्रम अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला तरी तिकीट विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने हा कार्यक्रम चक्क रद्द करत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना आर्ची-परशाचा कार्यक्रमांना जमणारी गर्दी...
बातम्या आणखी आहेत...