आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आर्ची\'चं सध्या चाललंय तरी काय? कुठल्या सिनेमाचे आहे हे पोस्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला. 100 कोटींचा गल्ला जमवत या सिनेमाने मराठीतील सर्व रेकॉर्ड मोडित काढले. सिनेमाने केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांना याड लावले. ‘सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे सिनेसृष्टीला मिळाले आणि हे दोन्ही चेहरे एका रात्रीतून सुपरस्टार झाले. पहिल्याच सिनेमातील दमदार भूमिकेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. या सिनेमाच्या यशानंतर आकाश ठोसरला महेश मांजरेकर यांच्या आगामी 'फन अनलिमिटेड' या सिनेमासाठी साइन करण्यात आले. त्याची अधूनमधून झलकसुद्धा दिसत असते. पण काही दिवस प्रकाशझोतात राहिल्यानंतर रिंकू ब-याच दिवसांपासून चर्चेत नाहीये. सध्या रिंकू दहावीत असून अभ्यासाकडे लक्ष देत असल्याचे तिच्या फॅन्सला माहित आहे. पण अभ्यासासोबतच रिंकू आणखी एका गोष्टीत बिझी आहे आणि ती गोष्ट काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय.
 
कन्नड सिनेमात झळकणारेय रिंकू... 
रिंकू यंदा दहावीची परीक्षा देणारेय. त्यामुळे ती जोमाने अभ्यासाला लागली आहे. पण दहावीचा अभ्यास सांभाळत रिंकूने एका सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. होय... रिंकू पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'सैराट' या सिनेमाचा दक्षिणेत रिमेक होणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला मागील वर्षी दिली होती. 'सैराट'चा कन्नड भाषेत रिमेक होत असून या सिनेमाचे चित्रीकरणसुद्धा पूर्ण झाले आहे. या कन्नड सिनेमात रिंकूच आर्चीच्या भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते साथ्या प्रकाश यांचा मुलगा निशांत मुख्य भूमिकेत आहे. निशांत परश्याची भूमिका या सिनेमात वठवतोय. कन्नडमध्ये सैराट या सिनेमाचे शीर्षक हे ‘मनसु मल्लिगे’ असे आहे. 
 
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाली सिनेमातील गाणी रिलीज... 
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘मनसु मल्लिगे’ या सिनेमातील सर्व गाणी ऑनलाईन रिलीज करण्यात आली आहेत. कन्नडमध्येही अजय-अतुल यांनीच गाणी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केली आहेत. मराठीत अजय-अतुल, श्रेया घोषाल, चिन्मयी यांनी गाणी गायली होती. तर कन्नडमध्येही या गायकांचा आवाज ऐकायला मिळतोय. मराठी सिनेमात एकुण चार गाणी होती, तर कन्नडमध्ये मात्र एकुण पाच गाणी असून पाचवे गाणे गायक सोनू निगमच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. 

मार्च महिन्यात होणार सिनेमा रिलीज... 
दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. नारायण यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून याची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश आणि झी स्टुडिओ यांनी केली आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे समजते. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी रिंकूच्या नवीन सिनेमातील खास Photos आणि साँगचा Audio Jukebox घेऊन आलो आहोत. 
 
चला तर मग पुढील स्लाईड्सपासून बघा, कन्नड सिनेमातील रिंकूचे खास फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर ऐका सिनेमातील सर्व गाणी...  
बातम्या आणखी आहेत...