आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडीची GST एक्सप्रेस' झाली सैराट... 'सल्या-बाळ्या'च्या एन्ट्रीने मंचावर फुटणार हास्याची हंडी !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई :  कलर्स मराठीवर अलीकडेच सुरु झालेला 'कॉमेडीची GST एक्सप्रेस' हा कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी पात्रे, खुशखुशीत विनोदशैली यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. आता या मंचावर महाराष्ट्राचे लाडके, ज्यांनी 'सैराट' या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळवली, असे सल्या आणि बाळ्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कलर्स मराठीवरील कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमामधून आणि प्रेक्षकांना भरपूर हसवणार आहेत. प्रेक्षकांना हा भाग 14 आणि 15 ऑगस्टला रात्री 9 वा. बघायला मिळणार आहे. दहीहंडी विशेष भागामध्ये GST च्या मंचावर सल्या आणि बाळ्याच्या म्हणजेच अरबाज शेख, तानाजी गालगुंडेच्या एन्ट्रीने हास्याची हंडी फुटणार यात काहीच शंका नाही.
 
कार्यक्रमामध्ये दोघांच्या येण्याने हास्याचे स्फोट फुटले, दोघांनी संदीप पाठक यांच्याबरोबर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या दहीहंडी खास भागामध्ये हंडी पथक आले होते ज्यामध्ये या दोघांनीही पथकाच्या गोविंदांबरोबर हंडी फोडली. संदीप, सल्या आणि बाळ्या तिघांनी मिळून पथकाच्या मुलांसोबत झिंगाट या लोकप्रिय गाण्यावर मनसोक्त डान्स केला.
 
सल्या आणि बाळ्या या दोघांना या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या भागामध्ये सल्या कृष्ण तर बाळ्या पेंद्याची भूमिका करणार आहे तसेच संदीप पाठक मावशीच्या रुपात दिसणार आहेत. या तिघांनाही मिळून मंचावर धुमाकूळ तर घातलाच आणि प्रेक्षकांना सल्या आणि बाळ्या यांनी मिळून भरपूर हसवले. 

पुढील स्लाईड्सवर बघा,  'कॉमेडीची GST एक्सप्रेस'च्या मंचावर क्लिक झालेली तानाजी आणि अरबाजची खास छायाचित्रे...
  
बातम्या आणखी आहेत...