आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'ची कोटींच्या कोटी उड्डाणे, या तीन भाषेत येणार सिनेमा, पाहा सक्सेस BASH

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूम घातली आहे. कोटींच्या कोटी उड्डाणे घेऊन सिनेमाने 85 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
सैराटने महाराष्ट्रातील हिंदी व इंगजी चित्रपटांच्याही कमाईला मागे टाकत, महाराष्ट्रात सर्वाधिक कमावणारा चित्रपट असा रेकॉर्ड बनवला आहे. आता हा सिनेमा लवकरच तीन प्रादेशिक भाषेत येणार आहे. गेल्याच आठवड्यात 'सैराट'ने 81 कोटींची कमाई केली होती. सिनेमाने कमाईत मराठी चित्रपट सृष्टीत नवा विक्रम प्रस्तापित केलाय. हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. असे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे.
कमाईत नवीन विक्रम करत असताना तामिळ, मल्यालम, तेलगू या भाषेत झी टॉकीज 'सैराट'ची निर्मिती करणार आहे. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात प्रथमच तीन प्रादेशिक भाषेत मराठी सिनेमाचे दुसऱ्या भाषेत डबींग होत आहे.
अलीकडेच 'सैराट'ने 85 कोटींच्या यशाचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनची पार्टी मुंबईच्या ट्राइडेंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अभिनेते सचिन पिळगावकर, नागराज मंजुळे, अजय-अतुलसह 'सैराट'चे सर्व कलाकार पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सैराट'च्या कलाकारांचे झिंगाट सेलिब्रेशन...
बातम्या आणखी आहेत...