आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO+PIX: \'याड लावल्या\'नंतर \'सैराट\'मधले झिंग चढवणारे \'झिंग झिंग झिंगाट...\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः रविवारी पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अजय-अतुल यांनी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सैराट' या सिनेमातील झिंग झिंग झिंगाट हे गाणे सादर केले आणि प्रत्येकावर या गाण्याची झिंग चढली. आता हे गाणे सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. अजय-अतुलचे संगीत आणि त्यांच्याच आवाजातील हे गाणे अतिशय श्रवणीय झाले आहे. या गाण्याचे बोलसुद्धा अतिशय कॅची आहेत तरुणांनाच नव्हे तर मोठ्यांनाही हे गाणे वेड लावणारे आहे.

'सैराट'मधील 'याड लागलं', 'आताच बया का', 'सैराट झालं जी...' ही गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत. आता झिंग झिंग झिंगाट... हे गाणेसुद्धा लोकांना झिंगायला लावणारे आहे. नागराज मंजुळे याचं दिग्दर्शन असलेला ‘सैराट’ चित्रपटगृहात येत्या २९ एप्रिल ला झळकणार आहे.
पुढील स्लाईडसवर पाहा, झिंग चढवणा-या 'झिंग झिंग झिंगाट'च्या गाण्याचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...