Home »Bollywood »Marathi Cinekatta» Sairat Team In Casting Couch With Amey & Nipun

VIDEO: अमेयला रिंकूने का लावले पळवून, बघा कास्टिंग काऊचचा 'झिंगाट' एपिसोड

दिव्य मराठी वेब टीम | Jun 03, 2016, 13:20 PM IST


''कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपूण'' या बहुचर्चित वेब शोचा चौथा एपिसोड गुरुवारी संध्याकाळी रिलीज करण्यात आला. अवघ्या महाराष्ट्राला याडं लावलेल्या 'सैराट' सिनेमाची संपूर्ण टीम या एपिसोडमध्ये सहभागी झाली आहे. खरं तर आतापर्यंतचे कास्टिंग काऊचचे तिन्ही एपिसोड्स स्टुडिओत शूट झाले होते. मात्र हा पहिलाच एपिसोड आहे, जो नागराज यांच्या राहत्या घरी शूट झाला.

या व्हिडिओत दिग्दर्शक नागराज मंजुळे, आर्ची अर्थातच रिंकू राजगुरु, परशा (आकाश ठोसर) यांच्यासोबतच प्रिन्स (सूरज पवाज), सल्या (अरबाज), लंगड्या (तानाजी) दिसत आहेत. सैराटच्या टीमसोबत अगदी फूल टू धमाल मस्तीत अमेय आणि निपूण यांनी हा एपिसोड शूट केला. गंमत म्हणजे नागराज यांनी आपल्याला एखाद्या सिनेमात कास्ट करावे, म्हणून अमेयने चक्क नागराज यांच्यासोबत त्यांच्या घरीच राहण्याची तयारी दर्शवली. मात्र रिंकु आणि आकाशने त्याला तेथून मजेशीररित्या पळवून लावले.
हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर अमेय वाघने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर एक खास पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तो म्हणतो, ''मी आत्ता हिमाचल प्रदेशात आहे! इथे अंगाला घाम आणि फोन ला range येत नसते ! आज casting couch with amey and nipun चा sairaat episode आल्यापासून तुम्हा सगळ्यांचे घापाघप, रापारप , सपासप msgs , posts आणि comments येत आहेत! ह्या झिंगाट response नी आमच्या भा. डी .प ला बुंगाट hit केल्याबद्दल सगळ्यांना thanks thanks !!! मुंबईचं weather आणि आपल्या fans चा response कधीच थंड नसतो!! Ok bye !!''

चला तर मग वेळ न दवडता पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि बघा कास्टिंग काऊचचा सैराटच्या टीमसोबत रंगलेला हा झिंगाट एपिसोड आणि सोबतच त्यापुढील स्लाईड्समध्ये बघा, शूटिंगच्या वेळी क्लिक झालेले खास फोटोज...

Next Article

Recommended