आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Sakhee Mohan Gokhale Birthday Special

B\'day:वडील मोहन गोखलेंचा अभिनय वारसा पुढे नेतेय सखी, मराठीतून नव्हे हिंदीतून केलंय पदार्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - वडील मोहन गोखलेंसोबत चिमुकली सखी, उजवीकडे - सखीचा लेटेस्ट फोटो - Divya Marathi
डावीकडे - वडील मोहन गोखलेंसोबत चिमुकली सखी, उजवीकडे - सखीचा लेटेस्ट फोटो
झी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत रेश्मा हे साध्याभोळ्या मुलीचे पात्र साकारणारी अभिनेत्री सखी मोहन गोखले हिचा आज वाढदिवस आहे. तरुणाईची मालिका म्हणून ओळखल्या जाणा-या या मालिकेतून रेश्मा उर्फ सखी घराघरांत पोहचली आहे. तिची एक मोठी फॅन फॉलोईंग निर्माण झाली आहे. सुजय, आशू, अॅना, मीनल, आणि कैवल्य या मित्रमैत्रिणींची काळजी घेणारी रेश्मा सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.
अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी सखी दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची कन्या आहे. तर तिची आई शुभांगी गोखले या हिंदी आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीनेसुद्धा अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा आता सखी पुढे नेत आहे.
हिंदीतून केला अभिनयाचा श्रीगणेशा...
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली आहे. मात्र या मालिकेपूर्वी तिने हिंदी सिनेमातही काम केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'रंगरेज' या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने सखीने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. यामध्ये तिने वेणू हे पात्र रेखाटले होते. मात्र त्यावेळी फारसे कुणाचे लक्ष तिच्याकडे गेले नाही. पण 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून सखीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सखीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात तिची आई आणि वडिलांसोबतची खास छायाचित्रे...