'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत रेश्मा हे पात्र वठवणारी अभिनेत्री सखी मोहन गोखले हिचा 27 जुलै रोजी वाढदिवस होता. सखीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी सेटवर थाटात तिचा वाढदिवस साजरा केला.
यानिमित्ताने एक खास केक सखीसाठी मागवण्यात आला होता. या सेलिब्रेशनमध्ये सुजय अर्थातच अभिनेता सुव्रत आणि आशु अर्थातच अभिनेता पुष्कराज मस्तीच्या मूुडमध्ये दिसले.
चला तर मग पाहुयात, कसे झाले 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या सेटवर सखीचे बर्थडे सेलिब्रेशन...