आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चाणक्य 'ला सर्वोत्कृष्ट नाटकाचा 'सलाम पुणे पुरस्कार' जाहीर, डॉ. निलेश साबळेचा होणार सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या मनोज जोशी यांच्या 'चाणक्य ' नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा 'सलाम पुणे पुरस्कार ' जाहीर झाला असून याच वेळी अभिजित साटम निर्मित प्रियदर्शन जाधव अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या 'सुसाट' या नाटकालाही 'सलाम पुणे ' पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे होणाऱ्या रंगभूमिदिन सोहळ्यात माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके आणि पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील तसेच अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत एकुण 10 दिग्गजांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या दोन नाटकांसह प्रसिध्द विनोदी कलावंत 'पैचान कोण' फेम नवीन प्रभाकर, ख्यातनाम नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते, ऑर्केस्ट्राचा काळ गाजविलेले मोहनकुमार भंडारी आणि झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' प्रस्तुत करणारे अभिनेते डॉ. निलेश साबळे, पुण्यातील प्रसिध्द महिला शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांना यावेळी सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर पुणे युथ आयडॉल पुरस्काराने अजित बाबर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शासकीय अधिकारी असताना सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे आणि दुष्काळी परिस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सागर भागवत यांना या समारंभात विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रा. फुलचंद चाटे, अॅड. दिलीप जगताप, साहित्यिक संजय सोनवणी, ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर, निर्माते एम के धुमाळ, अॅड. एकनाथ जावीर, निलेश नवलाखा, विकास पाटील, जे के पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.