आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुयश-सुरुचीला लोकप्रिय जोडीचा तर \'जय मल्हार\'ला लोकप्रिय मालिकेला पुरस्कार, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलाम पुणे पुरस्कार स्वीकारताना कलाकार)

पुणे- शेवटच्या श्वासापर्यंत चित्रपट आणि कला क्षेत्रात काम करीत राहील, चित्रपट हाच माझा श्वास आहे. 'झपाटलेला' नंतर मला 'जय मल्हार' मालिकेबद्दल आणि याच वेळी माझ्या सिनेमा सृष्टीतील सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा सन्मान म्हणूनही 'सलाम पुणे' पुरस्कार मिळतो आहे. ही रसिक प्रेक्षकांनी माझ्या कामावर सदैव केलेली प्रेमाची बरसातच आहे. हा माझ्या आयुष्याचा अनमोल ठेवा असून तो मी कायम काम सुरु ठेवूनच जपेन, जीवनगौरव पुरस्कार कधीही घेणार नाही. रसिकांच्या या प्रेमपूर्वक सलामीला कामानेच दाद देईल असे मत निर्माते-अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केले. निमित्त होते सलाम पुणेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र दिन सोहळ्याचे.
'सलाम पुणे'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात प्रसिध्द कवी आणि साहित्यिक पद्मश्री फ. मु. शिंदे यांच्या हस्ते कोठारे यांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय त्यांच्या 'जय मल्हार' या मालिकेला ही यावेळी उत्कृष्ट आणि लोकप्रिय मालिकेचा पुरस्कार देण्यात आला. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा आणि नायक हा पुरस्कार याच मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे यांना तर लोकप्रिय चेहरा आणि नायिकेचा पुरस्कार याच मालिकेत म्हाळसाची भूमिका वठवणा-या सुरभी हांडे आणि बानूची भूमिका करणारी ईशा केसकर यांना प्रदान करण्यात आला.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीसाठी दरवर्षी दिला जाणारा 'सलाम पुणे' पुरस्कार यावेळी 'का रे दुरावा' या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांना प्रदान करण्यात आला. विनोदी मालिकेचा पुरस्कार प्रथमच यावेळी हिंदी मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा'ला देण्यात आला. या मालिकेचे निर्माते आसीतकुमार मोदी आणि नीला मोदी यांनी तो स्वीकारला. तरुणाईची विशेष मालिका म्हणून 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेला पुरस्कार देण्यात आला. स्वानंदी टिकेकर, सुवार्त जोशी, पूजा ठोंबरे आणि अमेय वाघ यांनी तो प्राध्यापक फुलचंद चाटे यांच्या हस्ते स्वीकारला. 'सलाम पुणे'चे अध्यक्ष शरद लोणकर, कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर तसेच 'असे हे कन्यादान'मधील अभिनेत्री राधा कुलकर्णी, 'आदेश'ची मिथीला नाईक, अभिनेत्री वृंदा बाळ, अभिनेता निखिल वैरागर, संगीतकार हर्षित अभिराज, आदी रामचंद्र, नरेंद्र भिडे, दिग्दर्शक शिव कदम यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हसवा हसवी सह सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले तर संगीतकार हर्षित अभिराज यांनी या सोहळ्याचा संगीतमय समारोप केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या सोहळ्याची निवडक छायाचित्रे...