पुणे: मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सलाम पुणे या संस्थेच्या वतीने अलीकडेच एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्युनिअर
अमिताभ बच्चन अर्थातच शशिकांत पेडवाल यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी 'मिस्टर अँड मिसेस' आणि 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' या दोन नाटकांतील कलाकारांचा गौरव करण्यात आला. याशिवाय पुण्यातील प्रसिध्द गायक चंद्रशेखर महामुनी आणि जळगावचे ज्यु.
अमिताभ बच्चन उर्फ शशिकांत पेडवाल आणि पुण्यातील एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांना 'सलाम पुणे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंद इंगळे, विद्याधर जोशी, चिन्मय मांडलेकर, मधुरा साटम, अभिजित साटम, अजित भुरे, प्रियदर्शन जाधव, अनिरुद्ध जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, निर्माता निलेश नवलाखा, अभिनेत्री डिम्पल चोपडे यांच्यासह बरेच कलावंत एका मंचावर आले होते.
यावेळी चंद्रशेखर महामुनी यांनी
आपल्या खास अदाकरीत देव आनंद यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली तर भाग्यश्री पेंध्ये आणि अनुप कुलथे यांनी तबला आणि व्हायोलीनची जुगलबंदी सादर केली. ज्यु.
बिग बींनी तर कार्यक्रमात धमाल उडविली. त्यांनी हॉट सीटवर केलेली प्रश्नोत्तरे आणि अमिताभ यांचे विविध चित्रपटातील संवाद सादर केले.
सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन केले तर मकरंद माळवे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कार्यक्रमाची खास क्षणचित्रे...