आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड युलियासोबत मराठी फिल्मच्या म्युझिक लाँचला पोहोचला सलमान, झाले दुहेरी सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. त्यांच्या या आगामी सिनेमाचे नाव आहे ‘रुबिक्स क्यूब’.  बुधवारी मुंबईत या सिनेमाचे ग्रॅण्ड म्युझिक लाँच करण्यात आले. या म्युझिक लाँचला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याची तथाकथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत हजर होता. एखाद्या मराठी फिल्मच्या म्युझिक लाँचला गर्लफ्रेंडसोबत हजेरी लावण्याची सलमानची ही पहिलीच वेळ होती. 

झाले दुहेरी सेलिब्रेशन...
सलमानच्या हस्ते यावेळी सिनेमाचे म्युझिक लाँच झाले. सोबतच आणखी एक सेलिब्रेशन यावेळी करण्यात आले. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांच्या लग्नाचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. सलमान आणि युलिया यांच्या उपस्थितीत महेश आणि मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा केला. 

युलियाने धरला ताल...
या सोहळ्यात सिनेमातील लीड स्टार्स गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे यांनी दमदार परफॉर्मन्स दिले. सोहळ्याचे आकर्षण ठरला तो युलियाचा परफॉर्मन्स. युलियाने यावेळी सोलो परफॉर्मन्स तर दिलाच पण सोबत महेश मांजरेकरांसोबतही तिने ताल धरला. 

महेश मांजरेकरांच्या फिल्ममध्ये सलमान आणि युलियाने गायले गाणे...
विशेष म्हणजे महेश मांजरेकरांच्या ‘रुबिक्स क्यूब’ या सिनेमात युलियाने गाणे गायले आहे. यावेळी सलमानने या सिनेमातील सर्वच गाणी श्रवणीय झाल्याचे सांगितले. तो इथवरच थांबला नाही तर महेश मांजरेकरांच्या आगामी 'एफयू' अर्थातच 'फन अनलिमिटेड' या सिनेमातील गाणीही उत्तम झाल्याचे त्याने यावेळी सांगितले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 'फन अनलिमिटेड' या सिनेमात सलमान खानने मराठी गाणे गायले असल्याचे महेश मांजरेकरांनी यावेळी सांगितले. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा,  ‘रुबिक्स क्यूब’ या सिनेमाच्या ग्रॅण्ड म्युझिक लाँचची खास छायाचित्रे.... 
बातम्या आणखी आहेत...