आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan At Marathi Film \'Janiva\' Trailer Launch

सलमानमुळे Postpone झाली मराठी फिल्म, पाहा त्याचं Filmच्या Eventचे भाईजानचे मूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जाणीवा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला आला सलमान खान
सलमान खान हा त्याच्या मित्रांसाठी राजा आहे. तो जे बोलतो, ज्या सूचना करतो, त्या-त्या त्याचे सगळे मित्र आणि त्याला आपला ‘भाई’ मानणारी लोकं ऐकतात. आणि ह्याचा पुन:प्रत्यय आला, नुकताच झालेल्या मराठी फिल्म ‘जाणीवा’च्या एका कार्यक्रमामध्ये.
‘जाणीवा’ ह्या फिल्ममधून अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकरांच्या मुलाचा फिल्म इंडस्ट्रीत डेब्यु होणार आहे. महेश मांजरेकर आणि सलमान खान हे गेली अनेक वर्ष मित्र आहेत. सलमानच्या फिल्म्समध्ये महेश मांजरेकरांचा काही ना काही सहभाग असतोच. आणि महेश मांजरेकरांच्या बहुतेक फिल्म्स ह्या सलमान खानने पाहिलेल्या असतात. त्यामुळे महेश मांजरेकरांच्या मुलाचा सत्याचा पहिला चित्रपट आहे, म्हटल्यावर सलमान खानने त्या चित्रपटात रस घेणं हे सहाजिकच आहे. त्यात सलमान खान हा अनेक डेब्युटंटना त्यांच्या करीयरमध्ये मदत करण्यासाठी फेमस आहेच.
‘जाणीवा’च्या मुंबईत झालेल्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये तर सलमान खानने आपल्या खास अंदाजात खूप मजा आणली. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण अर्थातच ‘बजरंगी भाईजान’ होता. आणि भाईजानने नेहमीप्रमाणे आपले वेगवेगळे मुड्सही फोटो क्लिक करताना फोटोग्राफर्सना दाखवलेच.
एवढंच नाही सलमान आला की, तो कोणाची तरी खोड काढतो. तर कुणाची गुपितं सांगतो, हे आता त्याला चांगलं ओळखणा-यांना माहित झालंय. ह्या कार्यक्रमातही सलमानने आपल्या खुमासदार शैलीत लोकांचं मनोरंजन केलं. ‘आपणच जाणीवाची फिल्म रिलीज डेट पूढे ढकलली’ असे तो बिंधास्तपणे बोलला. एवढंच नाही, तर आपल्या मित्राच्या मुलाची सत्याची चार-चौघांमध्ये टेर खेचायलाही त्याने मागे-पूढे पाहिले नाही.
पूढील स्लाइडमध्ये वाचा, बजरंगी भाईजानने कोणाची केली पोल-खोल