आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX : महेश मांजरेकरांच्या B'day बॅशमध्ये पोहोचला सलमान, दिसली मराठी सेलेब्सची मांदियाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी नुकतीच वयाची 58 वर्षे पूर्ण केली. 16 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या बर्थडे पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मराठी सेलिब्रिटींशिवाय बॉलिवूडमधला एक खास पाहुणा या पार्टीत पोहोचला होता. हा खास पाहुणा म्हणजे महेश मांजरेकरांचा जिगरी मित्र सलमान खान होता. आपल्या मित्राला बर्थडे विश करण्यासाठी सलमान आवर्जुन पार्टीत पोहोचला आणि बराच वेळ पार्टीत थांबलासुद्धा.

कोणकोण पोहोचले पार्टीत....
सलमान खानसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी महेश मांजरेकांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन पार्टीत पोहोचले होते. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, मनवा नाईक, कोरिओग्राफर उमेश जाधव आणि त्यांची पत्नी सोनल, जयवंत वाडकर, भारती आचरेकर, पुष्कर श्रोत्री, अजित परब, सुशांत शेलार आणि त्याची पत्नी साक्षी, दिग्दर्शक रवी जाधव, वैभव मांगले, अतुल परचुरे आणि त्यांची पत्नी सोनिया परचुरे, संगीतकार राहुल रानडे, सुनील बर्वे, विजू माने, आनंद इंगळे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह बरेच मराठी सेलिब्रिटी या पार्टीत हजर होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, महेश मांजरेकर यांच्या बर्थडे बॅशची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...