आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Attends Marathi Film Natsamrat\'s Success Bash

Xclusive:सलमान खान पोहोचला नटसम्राटच्या Success पार्टीत, लवकरच पाहणार फिल्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नटसम्राट’च्या घवघवीत यशाचे सेलिब्रेशन चालले होते. आणि रात्री जवळ जवळ दोनच्या सुमारास सलमान खान पार्टीत पोहोचला. आणि पार्टीनंतरची आफ्टर पार्टी चालू झाली. महेश मांजरेकर आणि सलमान खान जिगरी दोस्त आहेत. त्यामुळे आपल्या मित्राच्या ह्या एवढ्या अप्रतिम चित्रपटाला क्लासेस आणि मासेस दोन्हींकडून वाहवाही मिळत असताना ‘यारों का यार’ सलमान खान आला नसता तरच नवल.
सलमान खान पोहोचल्यावर पहिल्यांदा महेश मांजेरकरांना मिठी मारून त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर नानांना त्याची नजर शोधू लागली. मात्र नऊ वाजता सुरू झालेल्या पार्टीतले पाहूणे साधारण १२ वाजेपर्यंत निघाल्यावर नानाही निघून गेले होते. त्यामुळे नानांशी त्याची भेट झाली नाही. पण नानांचा मुलगा मल्हार पाटेकर पार्टीत उपस्थित होता. आणि मल्हारला भेटून त्याने ह्या चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले. ट्रेलरचेच सलमान कौतुक करू शकला. कारण सलमानने अद्याप फिल्म पाहिलीच नाहीये.
सलमान आता फिल्म कधी पाहणार? असं महेश मांजरेकरांना विचारल्यावर ते म्हणाले, “सलमान लवकरच सिनेमा पाहिलं. त्याला त्याच्या घरच्यांसोबत फिल्म पाहायचीय. सध्या फिल्मला काय प्रतिसाद मिळतोय ते सलमानला चांगलं ठावूक आहे. पण खरं सांगू का, सलमान खानने किंवा बॉलीवूडमधल्या कोणी फिल्म पाहिली, हे प्रेक्षकांना सांगून आणि त्यांची कौतुकाची थाप सिनेमाला कशी मिळालीय, ह्याची जाहिरात करून सिनेमाला प्रेक्षक गोळा करणा-यांमधला मी नाहीये. नानाला मी नुकतंच म्हटलंय, की आता प्रेक्षकांना आवडलाय ना, सिनेमा आता आपण बॉलीवूडसाठी एक स्क्रिनिंग करूया. बॉलीवूडला सिनेमा आवडावा अशी इच्छा आहे. पण त्यांच्यामुळे सिनेमा चालावा अशी इच्छा नाही.”
कोणी कोणी आत्तापर्यंत फिल्म पाहिली हे सांगताना नाना पाटेकर म्हणाले, “गोविंद नामदेव, टिकू तलसानिया, बोनी कपूर, श्रीदेवी आणि अनेकांनी सिनेमा पाहिल्याचं समजतंय. पण ह्याही पेक्षा ज्यांच्यासाठी बनवला, त्या प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला, हे महत्वाचं.”