Home »Bollywood »Marathi Cinekatta» Salman Khan Released Akash Thosar FU Movie First Look

सलमानने रिलीज केला 'परश्या' च्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 10, 2017, 15:01 PM IST

‘सैराट’फेम आकाश ठोसरच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे सुपरस्टार सलमान खानने या सिनेमाचा फर्स्ट लूक ट्वीट केला आहे. एफयू असे या सिनेमाचे नाव आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित आकाशच्या नवीन सिनेमाचे नाव आहे 'FU'. आता 'FU' या शीर्षकात नेमके दडले तरी काय हा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात डोकावला असेल ना... 'FU'चा अर्थ आहे Fun Unlimited. अर्थात हे आहे आकाशच्या नवीन सिनेमाचे नाव. हा सिनेमा तरूणाईवर आधारित असल्याचे महेश मांजरेकर सांगतात. या सिनेमात चार मित्रांची गोष्टी आहे. महेश मांजरेकर सांगतात, की याच्या इनिशियल्समधून त्याचा अर्थ उघड होतो. मात्र सेन्सॉर बोर्डासाठी या सिनेमाचे नाव ‘फन अनलिमिटेड’ आहे. आम्हाला वाद नकोय, असे मांजरेकर उपहासाने म्हणाले.
मैत्रीवर आधारित 'FU' या सिनेमात आकाशसोबत महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरसुद्धा काम करतोय. शिवाय अभिनेत्री संस्कृती बालगुडेचीही महत्त्वाची भूमिका सिनेमात असल्याचे समजते. इतर कलाकारांविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’मधून आकाश ठोसर महाराष्ट्रासह देशभर पोहोचला. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडनेही सैराट आणि त्यातील कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं होतं. दरम्यान, सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. याच मैत्रीखातर सलमान खानने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ‘एफयू’चं पोस्टर रिलीज केलं आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सलमानने काय ट्विट करुन हे पोस्टर रिलीय केलयं...

Next Article

Recommended