आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंद अभ्यंकर यांची लेक सानिकाचे मालदीवमध्ये हनीमून सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत अभिनेता आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली होती. या विवाहसोहळ्याला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती. लग्नानंतर सानिका मालदीवमध्ये हनीमून सेलिब्रेट करत आहे. यावेळी काही खास फोटो तिने इन्सटाग्रामवरही शेअर केले आहेत. जुलैमध्ये झाला होता साखरपुडा...

 

सानिकाचा जुलैमध्ये साखरपुडा झाला होता. सानिकाच्या पतीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही कारण त्याचे पूर्ण नाव अजून समोर आलेले नाही. पण सानिकाच्या इन्सटाग्रामच्या अकाउंटवरुन तिच्या पतीचे नाव विवेक असल्याचे कळते. 

 

मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे सानिका...
सानिकाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून ती काम करतेय. शिवाय छोट्या पडद्यावरील ढोलकीच्या तालावर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 23 डिसेंबर 2012 रोजी आनंद अभ्यंकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर सानिकाने आनंद अभ्यंकर यांच्यावर ब्लॉग लिहायला सुरूवात केली आणि त्या ब्लॉगचे रूपांतर पुस्तकात झाले. 'अलाइव्ह' (Alive) हे सानिकाच्या पुस्तकाचे नाव आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सानिकाच्या हनीमून तसेच लग्नाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...