आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: राज ठाकरेंच्या हस्ते झाला 'ये रे ये रे पैसा'चा मुहूर्त, मेन लीडमध्ये सिद्धार्थ-तेजस्विनी-उमेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः संजय जाधव यांचे दिग्दर्शन असणाऱ्या बहुचर्चित  ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचा मुहूर्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अलीकडेच मुंबईत झाला. यावेळी चित्रपटातील स्टारकास्टसुद्धा रिव्हील करण्यात आली. विशेष म्हणजे  संजय जाधव गँग मधील ही स्टारकास्ट नसून यावेळी एक वेगळी स्टारकास्ट संजय जाधव प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.  संजय जाधव यांच्या आजवरच्या सिनेमात स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर हे दोन कलाकार निश्चित असायचे. पण यावेळी मात्र हे दोघे संजय जाधव यांच्या सिनेमाचा भाग नसून ‘ये रे ये रे पैसा’मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. 
 
चित्रपटाचा विषय हा वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी, थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून नवीन परिभाषा असेलेला असेल. चित्रपटाच्या मुहूर्ताला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची उपस्थिती होती. 'ये रे ये रे पैसा’ चित्रपटाची एव्हीके फिल्म्स, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली निर्मिती, ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार यांनी केली आहे. ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट पुढील वर्षी 5 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा,  'ये रे ये रे पैसा'च्या मुहूर्ताची आणि चित्रपटाच्या हटके पोस्टर्सची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...