आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय जाधवचा नवा सिनेमा 'तू ही रे', पडद्यावर रंगणार सई-स्वप्नील-तेजस्विनीची केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तू ही रे' या सिनेमाचे पोस्टर, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीत)

'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' या सिनेमांना बॉक्स ऑफीसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना 'प्रेम', 'मैत्री' या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवलं ते या दोन सिनेमांनी. 'प्यारवाली लव्हस्टोरी'ने प्रेमाच्या एका अनोख्या जगात नेलं तर 'दुनियादारी'ने मैत्रीची सफर घडवून आणली. या दोन्ही सिनेमाचे मेकर असलेले संजय जाधव आपल्या समोर अजून एक लव्हस्टोरी घेऊन येतायत. नुकतचं या सिनेमाचा मुहूर्त रोमॅंटिक गाण्याच्या रेकॉर्डिंगने पार पडला.

'तू ही रे' असं या सिनेमाचं नाव असून स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजीवसनमध्ये सिनेमाच्या गाण्याच रेकॉर्डिंग झालं. एकंदरच रोमॅंटिक सागा असलेल्या या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक अमितराज आणि पंकज पडघन आहेत. सिनेमाची गीते गुरू ठाकुर यांनी लिहिली आहेच. गाण्याच्या रेकॉर्डिंगची सुरुवात झाली ती अमितराज दिग्दर्शित गाण्याने. हे गाणं आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय.
मनस्विनी लता रविंद्र यांनी सिनेमाची कथा लिहिली असून करण एन्टरटेन्मेंट तसेच इंडियन फिल्म्स स्टूडिओ आणि संजय जाधव यांच्या ड्रिमिंग २४/७ या बॅनर खाली सिनेमाची निर्मिती होणार आहे. 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' प्रमाणेच याही सिनेमात आपल्याला तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या याही सिनेमाचं वेड प्रेक्षकांना लागेल यात तीळमात्र शंका नाही. यावर्षी सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. तेव्हा उत्सुकता ताणून धरा 'तू ही रे' सिनेमाची...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या मुहूर्ताची छायाचित्रे...