आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanskruti Balgude Given Intimate Scene In Film Shortcut

OMG :संस्कृती बालगुडे बनली ‘बोल्ड’,दिला इंटीमेट सीन,पाहा संस्कृतीचा सेन्शुअस अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेन्शुअस संस्कृती बालगुडे
बॉलीवूड अभिनेत्रींचा इंटिमेट सीन ही गोष्ट काही आता आपल्यासाठी नवीन नाही. त्यांना चित्रपटात स्मुचिंग करताना किंवा इंटिमेट सीन्स देताना आपण पाहतो. पण मराठी अभिनेत्री कितीही बोल्ड झाल्या तरीही अजून यापासून लांबच असतात. त्या फार तर फार हिरोला चित्रपटात किस वगैर देतात. पण इंटिमेट सीन किंवा स्मुचिंग ह्यापासून स्वत:ला दूरचं ठेवणं पसंत करतात.
पण स्मॉल स्क्रिनवरची बबली गर्ल, ‘पिंजरा’ आणि ‘विवाहबंधन’ टीव्ही मालिकांमधली लाजरी नायिका संस्कृती बालगुडे आता आपल्या टिपीकल सूनेच्या भूमिकांमधनं बाहेर पडून मराठी सिनेमाची हिरोइन झाली आहे. आणि तिने आता तिचा पहिला इंटिमेट सीनही केला आहे.
हरिश राऊत दिग्दर्शित ‘शॉर्टकट’ ह्या तिच्या आगामी चित्रपटात ती आता फक्त बोल्ड अंदाजात नाही तर एक इंटिमेट सीन देतानाही दिसणार आहे. ह्या सीनबद्दल विचारल्यावर संस्कृती म्हणाली,“मी ह्यामध्ये इशिका ह्या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. मी ह्यात केलेला इंटिमेट सीन हा माझ्यासाठी खूपच अवघड होता. पहिल्यांदा स्क्रिनवर इंटिमेट होणं कठीण होतं. त्यासाठी अगदी मी फिल्म्सही पाहिल्या. कसे इंटिमेट सीन करायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.पण शेवटी सीन करायचा म्हटल्यावर पोटात गोळा आलाच.”
संस्कृती पूढे हसून म्हणते, “तसं हा इंटिमेट सीन खूपच क्युट आहे. फिल्म पाहताना तुम्हांला दोन प्रेमी एकत्र येतात. आणि एकमेकांसोबत इंटिमेट होतात हे दिसेल. खरं तर, तुम्हांला त्यात काही वावगं जाणवणारही नाही. खरं तर, त्यात काहीच चुक नाही. ती तर स्क्रिप्टची डिमांडच होती. पण तरीही माझा हा पहिला एक्सपिरिअन्स होता. म्हणून मी घाबरले होते. आणि आता ते आठवताना स्वत:वरच हसू येते आहे.”
पूढील स्लाइडवर वाचा, कोणासोबत संस्कृती बालगुडे झाली इंटिमेट