आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्या\' एका चित्रपटाने संस्कृतीत झाला मोठा बदल, म्हणतेय सहकलाकार पाहून निवडते चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी मालिका व चित्रपट क्षेत्रात मला आता कुठे चार -पाच वर्षेच होत आहेत. पण मला भारंभार चित्रपट देखील स्वीकारायचे नाहीत आणि आपल्या वयानुसार मिळणारा खऱ्या आयुष्याचा आनंद देखील हिरावायचा नाही. म्हणूनच थोडी सावकाशीने वाटचाल करतेय,  असे संस्कृती बालगुडेने एका भेटीत सांगितले. अभिनयाबद्दल सुरुवातीस मी फार गंभीर नव्हते पण सुमुखी पेंडसेने The devil wears Prada हा हॉलीवूड चित्रपट पाहायला सांगितला आणि माझ्यात खूप बदल होत गेला, अशी कबुलीही संस्कृतीने दिली.
     
'पिंजरा' या मालिकेने घराघरात पोहचलेल्या संस्कृतीने सतिश राजवाडे दिग्दर्शित 'सांगतो ऐका' व्दारे मराठी चित्रपटात पाऊल टाकत चित्रपट समिक्षक व प्रेक्षक या दोघांचेही लक्ष वेधून घेतले. 
     
या चित्रपटात ती सचिन पिळगावकर याची नायिका होती. या चित्रपटाबाबत संस्कृतीची अगदीच वेगळी आठवण आहे. ती सांगत होती,  या चित्रपटाचा फर्स्ट लुक व गाण्याचा ध्वनिफित प्रकाशनाच्या सोहळ्यास सलमान खान प्रमुख पाहुणा होता. भरदुपारच्या या इव्हेंटला गर्दीही खूप झाली होती व माझा पहिलाच चित्रपट म्हणून माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. एकूणच तेव्हाचे वातावरण मला नवीनच होते. सुरुवातीस दाखवलेल्या गाण्यातील माझ्या लावणी नृत्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मला थोडे हलके वाटले. खुद्द शेजारीच बसलेल्या सलमानने केलेल्या स्तुतीने मी शहारले. मला हा अनुभव नवीनच होता. मुख्य कार्यक्रम संपताच सलमान लगेचच निघाल्याने त्याच्यासोबत फोटो काढायचा राहतोय की काय याची घाई उडाली, संस्कृती त्या दिवसाच्या आठवणीत हरखून गेली. 
     
'सांगतो ऐका' नंतर संस्कृतीचे 'निवडुंग', 'शिव्या', 'एफयु' असे आणखीन काही चित्रपट प्रदर्शित झाले आणि आताही काही चित्रपट येतील. याबाबत ती सांगत होती, दिल दिमाग बत्ती, लग्न मुबारक, बेभान असे माझे आणखीन चित्रपट येताहेत. मिलिंद शिंदे दिग्दर्शित चित्रपटातही मी आहे. त्या चित्रपटाचे नाव निश्चित व्हायचेय. या एकूणच वाटचालीबद्दल मी पूर्ण समाधानी आहे. नवीन चित्रपट स्वीकारताना मी पटकथा व सहकलाकार यांना जास्त महत्व देते. कोणत्याही स्वरूपाचा चित्रपट पटकथेत मजबूत हवाच. चित्रीकरण काळात दिग्दर्शकाशी सतत चर्चा होतेच तर आपल्या स्वभावाशी सुसंगत सहकलाकार असतील तर चित्रीकरण रंगते, सेटवर वातावरण चांगले राहते. तसे मला अजून बरेच शिकायचंय, आपल्या मार्गाने वाटचाल करायचीय. अनेक प्रकारची माणसे व त्यातून येणारे अनुभव यामधून योग्य ते शिकत वाटचाल करेन याचा मला विश्वास आहे असे संस्कृती सांगते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, संस्कृतीचे पहिल्या मालिकेपासून ते आतापर्यंतचे फोटोज्...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...