आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरची 'आनंदी' आता झाली ग्लॅमरस आणि बोल्ड, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर प्रसारित झालेली आणि गाजलेली 'पिंजरा' ही मालिका तुम्हाला आठवते का... होय आम्ही बोलतोय ते झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेविषयी. या मालिकेतून एक क्यूट आणि नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्या अभिनेत्रीचे नाव संस्कृती बालगुडे. या मालिकेत ग्रामीण भागातील आनंदी नावाच्या तरुणीची भूमिका तिने चोख वठवली होती. या मालिकेला मिळालेल्या यशानंतर संस्कृतीने मागे वळून पाहिले नाही.
छोट्या पडद्यानंतर मोठा पडदा तिला खुणावू लागला. मालिकेत अगदीच साधी आणि नॉन ग्लॅमरस दिसलेली संस्कृती मोठ्या पडद्याकडे वळताना मात्र ग्लॅमरस झाली. 'सांगते ऐका' या सिनेमानंतर आता तिचा 'शॉर्टकट' हा सिनेमा उद्या म्हणजे 7 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात संस्कृतीचा आजवर तिच्या चाहत्यांनी न पाहिलेला ग्लॅमरस अवतार पाहायला मिळणारेय.
या सिनेमाची पहिली झलक समोर आली आणि संस्कृतीच्या फॅशनेबल आणि हॉट लूक चर्चेचा विषय बनला. विशेष म्हणजे या सिनेमासाठी संस्कृती ग्लॅमरसच नव्हे तर बोल्डसुद्धा झाली आहे. अभिनेता वैभव तत्ववादीसोबत तिने पडद्यावर हॉट किसींग सीन दिला आहे. . या सिनेमाच्या माध्यमातून वैभव आणि संस्कृती बालगुडे ही अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
''शॉर्टकटमुळे मी माझ्या खासगी आयुष्यातसुद्धा थोडीशी ग्लॅमरस व्हायला लागलेय. पडद्यावर स्वतःला असे पाहण्यात वेगळीच मजा येत आहे'', असे संस्कृती सांगते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'शॉर्टकट' या सिनेमातील संस्कृतीच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकची खास झलक...