आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive - संतोष-मृणालचं स्मॉलस्क्रिनवर कमबॅक, दिसणार ‘असं सासर सुरेख बाई’ मालिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृणाल दुसानिस आणि संतोष जुवेकरचे मालिकेसाठीचे फोटोशूट
‘असं सासर सुरेख बाई’ ही मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. ह्या मालिकेत अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ‘बेधुंद मनाच्या लहरी’, ‘वादळवाट’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘जीवलगा’मधनं टेलिव्हीजनवर दिसलेला संतोष गेली ९ वर्ष मोठ्या पडद्यावरच रमला. पण आता ‘कलर्स’च्या या नव्या मालिकेतून तो पून्हा एकदा रोज घरातल्या टीव्हीसंचावर दिसू शकणार आहे. अभिनेत्री मृणाल दूसानिस सुध्दा ‘तू तिथे मी’ या मालिकेनंतर डेलीसोपच्या दूनियेतून गायब झाली होती. आता ती सूध्दा डेलीसोपमध्ये या मालिकेतून परततेय.
मालिकेचं शुटिंग अद्याप सुरू झालेले नाही. हे शुटिंग सुरू होण्याअगोदर मृणाल दुसानिस आणि संतोष जुवेकर यांचं मालिकेसाठी एक खास फोटोशूट करण्यात आले. जे फक्त divyamarathi.com कडे आहे. मालिकेसाठी फोटोशूट करताकरता आम्ही दोन्ही कलावंताशी संवादही साधला.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, असं सासरं सुरेख बाई मधल्या भूमिकेवविषयी काय सांगत आहेत, संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस
(सर्व फोटो - प्रदिप चव्हाण)