आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बायकर्स अड्डा'च्या यशासाठी संतोषने घातले बाप्पाला साकडे, दुष्काळग्रस्तांना दिला मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता संतोष जुवेकरने नुकतेच पुण्यातील तुळशीबाग गणपती, कसबा गणपती, गुरुजी तालीमच्या बाप्पांचे दर्शन घेत आपल्या आगामी 'बायकर्स अड्डा' या सिनेमाच्या यशासाठी बाप्पाकडे साकडे घातले. इतकेच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत 'बायकर्स अड्डा' या सिनेमाच्या वतीने मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती येथे दुष्काळ ग्रस्तांसाठी आर्थिक मदत रोख स्वरुपात देण्यात आली. शिवाय गणेश मंडळे, कार्यकर्ते, भाविक यांना दुष्काळग्रस्तांची आठवण ठेवा, मिरवणुकीत अचकट विचकट गाण्याना फाटा देत, गणेश भक्तीची धूम माजविणारी गाणी लावा, गैरप्रकारांना आळा घाला असे आवाहनदेखील केले.
संतोष जुवेकरसह 'बायकर्स अड्डा'ची टीम अर्थातच तन्वी किशोर, देवेंद्र भगत, अनिरुद्ध हरीप, राहुलराज डोंगरे, ऋषी मांडके या कलावंतांनी गणेश दर्शनासाठी सर्वत्र पायी फिरत रात्र जागविली. यावेळी बायकर्स अड्डा'चे निर्माते विजय हरिया, प्रमोद लोखंडे, दिग्दर्शक राजेश लाटकर त्यांच्यासोबत होते.
तुळशीबाग गणपती, कसबा गणपती, गुरुजी तालीमसह अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, निंबाळकर तालीम मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, कसबा गणपती या मंडळांनाही कलाकारांनी भेट दिली आणि गणपतीची आरती केली. यावेळी त्यांनी भाविकांशी संवादही साधला. भाविकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सारे कलावंत ही भारावून गेले.
पुढे पाहा, गणरायाचे दर्शन घेतानाची कलाकारांची छायाचित्रे...