आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then & Now: 23 वर्षांचा झाला प्रथमेश लघाटे, बघा \'सारेगमप\'च्या 5 लिटिल चॅम्प्सचे आताचे रुप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या सांगितिक रिअॅलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेला प्रथमेश लघाटे याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 23 वर्षे पूर्ण केली आहेत.  29 सप्टेंबर 1994  रोजी रत्नागिरी येथील  आरवली येथे सांगितिक पार्श्वभूमी असलेल्या लघाटे कुटुंबात प्रथमेशचा जन्म झाला. मुळ शास्त्रीय बाज असलेल्या प्रथमेशची आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणूनही एन्ट्री झाली आहे. 'दुनियादारी' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'यारा यारा' या गाण्याला प्रथमेशने स्वरसाज चढवला आहे. प्रथमेशने संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला असून आता परदेशात तो स्टेज शोज करत असतो. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियात प्रथमेश आणि सारेगमप लिटिल चॅम्प्समधील मुग्धा वैशंपायन यांनी गायनाचा कार्यक्रम केला होता.
 
जुलै 2008 ते फेब्रुवारी 2009 या काळात झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून प्रथमेश लोकप्रिय झाला. प्रथमेशने आपल्या मधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर सारेगमपच्या अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. महाअंतिम फेरीत 5 स्पर्धकांमध्ये तो होता. या स्पर्धेत कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. तर  प्रथमेश लघाटेसह मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, आर्या आंबेकर टॉप 4मध्ये होते. 
हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेला सांगितिक रिअॅलिटी शो ठरला होता. 
 
प्रथमेशप्रमाणेच इतर चार लिटील चॅम्प्ससुद्धा सांगितिक क्षेत्रातच कार्यरत आहेत. चला तर मग पुढच्या स्लाईड्सवर बघुयात, आता कसे दिसतात हे लिटील चॅम्प्स आणि सध्या कुठे आहेत बिझी... 
बातम्या आणखी आहेत...