आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ही चिमुकली आता झालीये ग्लॅमरस अॅक्ट्रेस, लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलासोबत झळकणार सिनेमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईसोबत दिसणारी ही चिमुकली आहे आर्या आंबेकर, उजवीकडे - खाली दिसणारा हा मुलगा आहे लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे आहे. - Divya Marathi
आईसोबत दिसणारी ही चिमुकली आहे आर्या आंबेकर, उजवीकडे - खाली दिसणारा हा मुलगा आहे लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे आहे.
एन्टरटेन्मेंट डेस्कः बऱ्याच वर्षांपूर्वी सारेगमप या कार्यक्रमाच्या लिटिल चॅम्पच्या पर्वातील चिमुरड्यांनी महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर गारूड केले होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाच सदस्य तर जणू त्या काळात प्रत्येक घरातील सदस्य बनले होते. त्यांच्यापैकीच एक नाव म्हणजे आर्या आंबेकर. वर दिसणा-या छायाचित्रांत दिसणारी ही चिमुकली आर्याच आहे. मधूर गळ्याची देणगी लाभलेल्या त्या चिमुरडीला पाहून प्रत्येक कुटुंबीयांना आपलीही अशीच एक मुलगी असावी असे वाटत होते. पण त्यावेळची आर्या आता मोठी तरुणी झाली आहे.
आज आर्याचा वाढदिवस असून तिने वयाची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. 6 जून 1994 रोजी नागपुरात जन्मलेल्या आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर सारेगमपच्या अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. महाअंतिम फेरीत 5 स्पर्धकांमध्ये आर्या होती.
आता आर्या अभिनेत्री म्हणून आपल्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्या झळकणारेय. 'टीएसकेके' असे यांच्या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पूर्ण झाले आहे. सिनेमात दोघांच्या भूमिका काय असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. आता आर्या अभिनेत्री होणार असली तरी तिने गाणे सोडलेले नाही. विविध कार्यक्रमांसह अल्बममधूनही ती प्रेक्षकांना भेटत असते. अलीकडच्या काळातच तिचे एक नवे गाणे युट्यूबवर पब्लिश करण्यात आले आहे. 'अलवार माझे मन बावरे..' या अल्बममध्ये तिने केवळ स्वरसाजच चढवलेला नाहीये, तर ती स्वतः अल्बमच्या व्हिडीओमध्ये झळकलीही आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आर्याची लेटेस्ट झलक आणि सोबतच जाणून घ्या या 'प्रिटी गर्ल'विषयी बरेच काही... सोबतच तुम्हाला तिच्या या नवीन व्हिडिओसुद्धा पुढे बघता येणारेय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्याWhatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...