आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चला हवा येऊ द्या’च्या प्रेक्षकांना धक्का, \'थुकरटवाडी\' घेणार प्रेक्षकांचा निरोप!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मराठी प्रेक्षकांचे अमाप प्रेम आणि अफाट लोकप्रियता मिळालेला शो 'चला हवा येऊ द्या' लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. मराठी चित्रपटांना आणि कलाकारांना प्रमोशनचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या या कार्यक्रमाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कार्यक्रमातील थुकरटवाडी गावाताली निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे यांनी प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवले पण आता शोचा होस्ट निलेश साबळेने आता थोडी विश्रांती घेणार, असे सांगितल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
 
'चला हवा येऊ द्या' या शोच्या जागी आता 'सारेगमप' हा नवीन शो सुरु होणार आहे. या शोसाठी गायकांचे ऑडिशन्स सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. 
 
'चला हवा येऊ द्या' शोच्या लोकप्रियतेचे वारे बॉलिवूडपर्यंत जाऊन धडकले होते. बॉलिवूडचे दिग्गज कलाकारांनीही या शोमध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या शोमध्ये आतापर्यंत सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन, इरफान खान, श्रीदेवी, नाना पाटेकर यांसारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, चला हवा येऊ द्याच्या सेटवर पोहोचलेले बॉलिवूड कलाकार...
बातम्या आणखी आहेत...