आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: \'भिकारी\'च्या स्क्रिनिंगला अवतरले तारांगण, सई, मुक्ता, मानसीसह दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिकारी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित सेलिब्रिटी - Divya Marathi
भिकारी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित सेलिब्रिटी
मुंबईः स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला भिकारी हा चित्रपट आज (4 ऑगस्ट) थिएटरमध्ये दाखल झाला आहे. गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी या सिनेमात आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची नाजूक गुंफण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातून रुचा इनामदार हा नवोदित अभिनेत्री सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचा जंगी प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

आईसोबत दिसले सेलेब्स..
या प्रीमिअरला अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आईसोबत हजेरी लावली होती. अभिनेत्री मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, सचिन पिळगावकर, महेश लिमये, दिपाली सय्यद, गणेश आचार्य, स्वप्नील जोशी यावेळी त्यांच्या आईसोबत दिसले. 

ग्लॅमरस लूकमध्ये दिसली सई...
प्रीमिअरला मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांची मांदियाळी बघायला मिळाली. जयवंत वाडकर, विजय चव्हाण, पियुष रानडे आणि त्याची पत्नी मयुरी, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मानसी नाईकसह अनेक सेलेब्स प्रीमिअला उपस्थित होते. यावेळी मानसीचा मराठमोळा लूक बघायला मिळाला. प्रीमिअरसाठी तिने साडीला पसंती दिली. तर सई ग्लॅमरस लूकमध्ये लक्ष वेधून गेली. तिने डार्क ब्लू कलरचा डिझायनर वन पीस परिधान केला होता. 

या प्रीमिअर सोहळ्याची खास झलक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...