आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebrities Attend Screening Of Marathi Film Dr. Prakash Baba Amte The Real Hero

डॉ. प्रकाश आणि मंदा आपटेंच्या उपस्थित झाले \'..द रिअल हिरो\'चे स्क्रिनिंग, पोहोचले मराठी सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आपटे , अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. समृद्धी पोरे, सोनाली कुलकर्णी नाना पाटेकर, सुनील बर्वे, श्रुती मराठे, तुषार दळवी, परेश मोकाशी, वैभव मांगले)
‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणा-या दिग्दर्शिका अॅड. समृध्दी पोरे दिग्दर्शित ‘डॉ.प्रकाश बाबा आमटे..द रिअल हिरो’ हा चित्रपट आज चित्रपटगृहात दाखल झाला आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासींच्या विकासासाठी अहोरात्र झटणा-या कर्मयोगी डॉ. प्रकाश आमटे यांच्या रोमहर्षक जीवनावर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आपटे यांच्या विशेष उपस्थिती हे स्क्रिनिंग पार पडले. यावेळी अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
अॅड. समृध्दी पोरे, नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासह तेजश्री प्रधान, शशांक केतकर, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, जयवंत वाडकर, मीना नाईक, मनवा नाईक, तुषार दळवी, सुबोध भावे, चंद्रकांत कुलकर्णी, श्रुती मराठे, सुनील बर्वे, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, वैभव मांगले, मधुगंधा कुलकर्णी यांनी स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी या कसलेल्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आपटे या व्यक्तिरेखा रुपेरी पडदयावर साकारल्या आहेत. वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधाची उपलब्धता नसणा-या या दुर्गम भागात एका डॉक्टरने गेली 45 वर्षे माडीया-गोंड आदिवासींसाठी आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अविरत कष्ट घेतले. जो नक्षलवाद्यांशी आणि हिंस्त्र प्राण्यांशी सामना करता-करता रोज एक नवीन आयुष्य जगतोय आणि त्या जगण्याला साथ देतेय त्याची धर्म पत्नी कुठलेही वचन न घेता न देता... याच सत्य कहाणीवर बेतलेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे.. द रिअल हिरो' या चित्रपटाचे मराठी सेलिब्रिटींनी विशेष कौतुक केले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'डॉ. प्रकाश बाबा आमटे.. द रिअल हिरो' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या मराठी कलाकारांची खास छायाचित्रे...