आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ड्रीममॉल\'च्या स्क्रिनिंगला जमली मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा कोणकोण पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्क्रिनिंगला पोहोचलेले सेलिब्रिटी)
मुंबईः अभिनेता सिद्धार्थ जाधव स्टारर 'ड्रीममॉल' हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 26 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. यानिमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी मंगळवारी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.
अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि नेहा जोशी यांच्यासह पुष्कर श्रोत्री, अनिता दाते, सुहिता थत्ते, क्रांती रेडकर, चंद्रकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, जयवंत वाडकर, मृणाल कुलकर्णी, अशोक शिंदे, आदित्य सरपोतदार, निर्माते नानूभाई, मनीषा केळकर यांच्यासह बरेच सेलेब्स स्क्रिनिंगला उपस्थित होते.
या सिनेमात सिध्दार्थ जाधव एका विकृत सुरक्षारक्षकाच्या भूमिकेत आहे. हा सुरक्षारक्षक एका मॉलचा सिक्युरिटी गार्ड आहे. तर त्या मॉलमध्ये एका फिल्म प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये काम करणा-या एका मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा जोशी आहे. हा सिक्युरिटी गार्ड त्या मुलीला रात्री एकटी गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती मुलगी काय करते, ते या सिनेमातत पाहायला मिळणार आहे. सिध्दार्थ आणि नेहामधला थरार चित्रपटात अनुभवयला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'ड्रीममॉल'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...
फोटो- प्रदीप चव्हाण