आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Screening Of Urmila And Jitendra Joshi Starer Marathi Film Kakan

क्रांतीच्या \'काकण\'च्या स्क्रिनिंगला अवतरली मराठी फिल्म इंडस्ट्री, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दिग्दर्शित केलेला 'काकण' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीजच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. क्रांतीला तिच्या या पहिल्या प्रयत्नासाठी शुभेच्छा द्यायला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मान्यवरांनी स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या सिनेमाला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिवाय क्रांतीच्या दिग्दर्शनाचे खूप कौतुकदेखील या मान्यवरांनी केले.
कोण कोण पोहोचले स्क्रिनिंगला...
जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर स्टारर 'काकण'च्या स्क्रिनिंगला सचिन पिळगावकर आपल्या आईसोबत पोहोचले होते. शिवाय महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, अशोक शिंदे, सुबोध भावे, माधवी जुवेकर, गिरीजो ओक, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, आदिती सारंगधर, सोनाली खरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा काकणच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...