आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Marriage: स्वप्नीलच नव्हे या 6 मराठी सेलिब्रिटींनीही थाटला दुसरा संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा अधिक वेळा लग्न केल्याची अनेक उदाहरणे बघता येतील. सैफ अली खान, आमिर खान, संजय दत्त यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींनी एकापेक्षा अधिक वेळा लग्न थाटले. बॉलिवूडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतसुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत. मराठातील काही नावाजलेल्या सेलिब्रिटींचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी दुसरा जोडीदार शोधला आणि पुन्हा एकदा नव्याने वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. 
 
अभिनेता स्वप्नील जोशीचे पहिले लग्न ठरले अपयशी  
आज (18 ऑक्टोबर) वयाची 40 वर्षे पूर्ण करणारा  मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हीरो स्वप्नील जोशीसुद्धा खासगी आयुष्यात दोनदा लग्नाच्या बेडीत अडकला. स्वप्नीलचे दुसरे लग्न औरंगाबादच्या लीना आराध्येसोबत झाले. स्वप्नील आणि लीना 16 डिसेंबर 2011 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. विशेष म्हणजे स्वप्नील आणि लीनाचे हे अरेंज मॅरेज आहे. स्वप्नीलच्या पहिल्या पत्नीचे नाव अपर्णा आहे. अकरावीत शिकत असताना स्वप्नील आणि त्याची पहिली पत्नी अपर्णाचे सूत जुळले होते. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र फार काळ हे नाते टिकले नाही. लग्नाच्या केवळ चार वर्षांत स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. 2009 मध्ये तो अपर्णापासून कायदेशीररित्या विभक्त झाला. आता स्वप्नील आणि लीनाची एक मुलगी आहे.

स्वप्नील जोशीसह मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी कोणकोणत्या कलाकारांनी दुसरे लग्न केले, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये..  
बातम्या आणखी आहेत...