आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'PG'च्या हॉट गाण्यात दिसली लक्ष वेधून घेणारी उमेश-स्पृहाची सिझलिंग केमिस्ट्री, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('अ पेईंग घोस्ट' या सिनेमात उमेश कामत आणि स्पृहा जोशी)

अभिनेता उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही प्रेक्षकांची लाडकी जोडी 'एका लग्नाची तिसरी गोष्ट'नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मात्र यावेळी एखाद्या मालिकेत नव्हे तर एका सिनेमात या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. 'अ पेईंग घोस्ट' हे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमातील एक हॉट गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
'रातभर...' हे शब्द असलेल्या या गाण्यात उमेश आणि स्पृहाची हॉट केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले असून या गाण्याचे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. तर ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांच्या सुंदर आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी लाईन...
‘अ पेईंग घोस्ट’ या सिनेमात उमेश कामतने माधव माटेगावकरची भूमिका साकारली आहे. एक सरळ, साधा मुलगा असलेला माधव सगळ्यांसाठीच टार्गेट होतो. त्याला लोकं फसवतात. त्याचा फायदाही घेतात. माधवला एक मुलगीही आवडत असते. पण तो तिला आपल्या मनातल्या भावना सांगायला घाबरतो. त्याच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्याच्या घरी राहण्यासाठी भाडेकरू म्हणून काही भूतं येतात. हे त्याला माहित असते आणि माधवचा स्वभाव या भूतांमुळे पूर्णपणे बदलतो अशा स्वरुपाची भूमिका उमेशने सिनेमात साकारली आहे. एका लग्नाची तिसरी गोष्टनंतर स्पृहा जोशी आणि उमेश कामतची जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
सुश्रुत भागवत दिग्दर्शित' अ पेईंग घोस्ट' हा सिनेमा येत्या 29 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून उमेश कामत आणि स्पृहा जोशीसह पुष्कर शोत्री आणि श्रावणी पिल्लाई यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा उमेश-स्पृहाची हॉट केमिस्ट्री असलेल्या 'रातभर...' गाण्याचा खास व्हिडिओ...