आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Enjoys Spoof Of DDLJ In Chala Hawa Yevu Dya

\'चला हवा येऊ द्या\'मध्ये पोहोचला किंग खान; म्हणाला, आवडते पिठलं-भाकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये येत्या सोमवारी शाहरूख खान गुढीपाडवा साजरा करताना दिसणार आहे. शाहरूख खानची फिल्म १५ एप्रिलला रिलीज होतेय. आपल्या फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी शाहरूख खान ‘चला हवा येऊ द्या’च्या १७५व्या भागात नुकताच आला होता.
शाहरूख खानचं ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. फेटा बांधलेल्या शाहरूखने आपलं मराठमोळं स्वागत एन्जॉय केलं. एवढंच नाही तर, जवळ जवळ १८ ते २० फुटी उंच गुढीही त्याने उभारली.
आपलं मराठी कनेक्शन सांगताना शाहरूख खान म्हणाला, “मी जेव्हा मुंबईत नवीन आलो होतो, तेव्हा जुजबी मराठी शिकलो होतो. रस्त्यावरच्या आणि आरटीओच्या मराठी पाट्यांमूळे मराठी शिकायला बरीच मदत झाली. त्यावेळी मुंबईत फिरताना लक्षात राहिलेली मराठी पाटी होती, ‘गतीरोधक पूढे आहे.’ मला मराठी पदार्थांमध्ये पिठलं भाकरी खूप आवडते.”
कोणीही सेलिब्रिटी येणार म्हटल्यावर थुकरटवाडीच्या कलाकारांनी त्या सेलिब्रिटीच्या कोणत्या ना कोणत्या कलाकृतीवर स्पुफ बनवलेलं असतंच. शाहरूख खानही ह्या रिवाजातून सुटणं शक्यच नव्हतं. शाहरूख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगें’वर एक स्किट सादर करण्यात आलं. डीडीएलजेच्या क्लायमॅक्सवरचं हे स्किट होतं.
ह्या स्किटमध्ये सागर कारंडे काजोल बनला होता. तर कुशल बद्रिके शाहरूख खान बनला होता. अमरीश पुरीच्या भूमिकेत भारत गणेशपूरे होता. तर फरीदा जलालच्या भूमिकेत श्रेया बुगडे होती. आणि भाऊ कदम बनला होता ज्युनिअर आर्टिस्ट, भाऊ ज्युनिअर आर्टिस्ट बनून क्लायमॅक्सचा आपल्या स्टाइलमध्ये कसा विचका करतो, हे पाहून शाहरूख खान पोट धरून हसला.
एवढंच नाही तर डॉन शाहरूख खानला पकडण्यासाठी सीआयडी कुशल बद्रिके आणि दया भाऊ कदमने जे कारनामे केले त्यामूळेही किंग खानचं बरंच मनोरंजन झालं.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, थुकरटवाडीच्या विनोदांवर काय होती शाहरूख खानची प्रतिक्रिया