आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shankar Mahadevan Was Nervous To Give Music To Katyar Kalajat Ghusali

‘कट्यार..’चं Music करण्यापूर्वी शंकर महादेवनही घाबरला होता -म्हणाला एहसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुबोध भावे दिग्दर्शित, शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबध्द केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’, ह्या चित्रपटाचा संगीत अनावरण समारोह चालला होता. जेवढा भव्य हा चित्रपट आहे, तेवढाचं डोळे दिपवून टाकणारा संगीत अनावरण सोहळा व्हावा, असा निर्मात्यांचा प्रयत्न दिसत होता. ‘कट्यार…’ नाटकाशी निगडीत कलाकार आणि ‘कट्यार…’ चित्रपटाशी निगडीत कलावंत जमले होते. आणि सर्वांसमक्ष संगीतकार एहसान नुरानीने आपल्या मित्राविषयीचे गुपित सर्वांसमोर उघडे केले.
 
एहसान नुरानी ह्यांनी संगीत अनावरण सोहळ्यात सांगितलं की, “ जेव्हा सुबोधने शंकरला ह्या चित्रपटाच्या संगीताविषयी विचारणा केली तेव्हा, त्या मिटींगनंतर स्टुडियोत परतलेल्या शंकरनी घाबरतच मला सांगितलं की, ‘तूला माहित आहे, त्याने मला ‘कट्यार..’ सारख्या महान कलाकृतीसाठी संगीत द्यायला सांगितलंय, जे करणं, अशक्यच आहे.’  तो खूपच टेन्शनमध्ये होता. पण आम्हांला त्याची शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी आणि त्यावर असलेले प्रभूत्व माहित असल्याने आम्ही त्याला ह्या चित्रपटाला संगीत देण्याचा आग्रह धरला.”
 
लॉय म्हणतात, “ हे संगीत फक्त ह्या चित्रपटापूरत किंवा मराठी सिनेमाविश्वापूरतं मर्यादित न राहता, एक दैवी संगीत आहे. बॉलीवूडलाही अभिमान वाटावा अशी भारतीय संगीतातली एक महत्वाची कलाकृती म्हणून ह्या संगीताकडे पाहिलं जाईल असं मला वाटतं.”
 
शंकर महादेवन चित्रपटाच्या संगीतविषयी सांगतात, “आम्ही ३००हून अधिक गाणी बनवली आहेत. मी ३५ वर्ष शास्त्रीय संगीत शिकलोय. पण तरीही पंडित जीतेंद्र अभिषेकींचं दैवी संगीतच वेगळं आहे. त्यांच्या तोडीचं संगीत मी देणं शक्य नाही, हे मला माहित होतं. त्यामूळे खूप भीती वाटत होती. मराठी संगीत रंगभूमीवरचं ‘कट्यार..’ नाटक आणि त्यातलं अभिषेकीबूवांनी दिलेलं संगीत हे एक मैलाचा दगड म्हणून पाहिलं जातं. अशा नाटकावर आधारित चित्रपटात संगीत दिल्यावर तुमची त्यांच्या संगीताशी तूलना होणे ओघानेच आले. ते नको होतं. त्यामूळे घाबरलो होतो.” 
 
(फोटो -प्रदिप चव्हाण)
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण कोण सेलिब्रिटी आले, \'कट्यार काळजात घुसली\'च्या म्युझिक लाँचला