आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashank And Tejashree Celebrated 1st Wedding Anniversary Today

1st Wedding Ann: लग्नाच्या दुस-याच दिवशी शूटिंग सेटवर हजर झाले होते शशांक-तेजश्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शशांक आणि तेजश्री यांच्या लग्नातील खास क्षण)
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ही प्रसिद्ध जोडी आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. तेजश्री आणि शशांकची ओळख या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत प्रेयसी आणि प्रियकराची भूमिका करता करता हे दोघेजण खरोखरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नाच्या पवित्र बंधनात केले. 8 फेब्रुवारी 2014 रोजी पुण्यात सकाळी नऊ वाजता काही मोजक्या सेलिब्रेटींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत हे दोघे विवाहबद्ध झाले.
लग्नाला मराठमोळा पण होता ग्लॅमरस टच...
या दोघांचा लग्नसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला तरी त्याला मराठमोळा पण ग्लॅमरस टच होता. मराठमोळ्या वर-वधूच्या रूपात तेजश्री आणि शशांक खूप सुंदर दिसत होते. या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्रीच्या सहा आया लीना भागवत, स्मिता सरवदे, रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठारे, पूर्णिमा तळवलकर, सुहिता थत्ते या लग्नात सहभागी झाल्या होत्या. प्रवेशद्वाराशी शशांक आणि तेजश्रीचे चित्र असलेली सुंदर रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
प्रवेशिकेची घालण्यात आली होती अट...
शशांक आणि तेजश्रीची लोकप्रियता बघता लग्नसोहळ्यात आगंतुक पाहुण्यांची गर्दी वाढायला नको, म्हणून लग्नासाठी आमंत्रण दिलेल्यांना एक पत्रिका आणि त्यांच्या घरातून येणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रवेशिका देण्यात आली होती. तसेच रिसेप्शनच्याही प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. लग्नसोहळ्यात कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये केवळ यासाठी शशांक आणि तेजश्रीच्या कुटुंबीयांनी ही प्रवेशिकेची अट घातली होती.
लग्नाच्या दुस-याच दिवशी होते कामावर हजर...
खरं तर लग्नानंतर नवदाम्पत्य जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र शशांक आणि तेजश्री याला अपवाद ठरले होते. कारण लग्नाच्या दुस-याच दिवशी हे दोघेही शुटिंग सेटवर हजर होते. आपल्या खासगी गोष्टींमुळे काम अडता कामा नये, असे शशांकने एका मुलाखतीत सांगितले होते. या दोघांनी लग्नानंतरचा आपला पहिला व्हॅलेंटाइन डेदेखील शुटिंग सेटवरच साजरा केला होता.
प्रेक्षकांच्या लाडक्या 'श्री-जानू' अर्थातच शशांक आणि तेजश्रीच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज आम्ही तुम्हाला त्यांचा वेडिंग अल्बम दाखवत आहोत... पाहा कशाप्रकारे प्रधांनाची तेजश्री झाली केतकरांच्या घरची सून...