आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांकची दुसरी पत्नी बनली डोंबिवलीची प्रियांका ढवळे, व्यवसायाने आहे वकील, असे जुळले प्रेम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शशांक केतकर आज गर्लफ्रेंड प्रियांका ढवळेसोबत विवाहबंधनात अडकला आहे. शशांकचे हे दुसरे लग्न तर प्रियांकाचे पहिले लग्न आहे. शशांक केतकरने पहिली पत्नी आणि होणार सून मी ह्या घरची मालिकेतील त्याची कोस्टार तेजश्री प्रधानसोबत लग्न केले होते. पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. आता शशांकने दुसरा संसार प्रियांकासोबत थाटला आहे. पेश्याने वकील आहे प्रियांका...

 

शशांकची पत्नी प्रियंका ढवळे वकील आहे. शशांकने वर्षाच्या सुरुवातील फेसबुक डिपीला त्याचा आणि प्रियांकाचा फोटो लावून तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर 14 फेब्रुवारीला शशांकने साखरपुडा केला आणि त्याच्या या निर्णयाने फॅन्सला आनंद झाला. आज अखेर दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. 

 

लग्नाअगोदर बेस्ट फ्रेंड होते शशांक-प्रियांका..
अभिनेता शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे हे फॅमिली फ्रेंड्स होते. त्यानंतर कधीमधी दोघांची भेट होत असत. पण एकदा सहज हे दोघे भेटले आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. हळूहळू दोघांना एकमेकांवर असलेले प्रेम जाणवले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शशांक केतकर आणि प्रियांका ढवळेचे काही Cute Moments....

बातम्या आणखी आहेत...