आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashank Ketkar And Tejashree Pradhan File Divorce Application In Pune

\'श्री-जान्हवी\'चे ख-या आयुष्यातही बिनसले, पुण्यात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान)

मुंबई : 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर. या मालिकेच्या सेटवरच दोघांचे सूत जुळले आणि दीडवर्षापूर्वी प्रेक्षकांची ही लाडकी जोडी ख-या आयुष्यात विवाहबद्ध झाली. मात्र या दोघांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत चाललेले नाही आणि म्हणूनच दोघांनीही खऱ्या आयुष्यात एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
शशांकने पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 8 फेब्रुवारी 2014 मध्ये शशांक आणि तेजश्रीचा विवाह झाला होता. वर्षभरातच दोघांमध्ये कुरबुरी असल्याच्या चर्चांना उधाळ आले होते. मात्र सध्या मालिकेतही तसाच ट्रॅक सुरु असल्याने हा स्टंट असावा असे सर्वांना वाटले होते. मात्र आता हे वाद टोकाला पोहचल्याचे चित्र आहे. शशांकने पुण्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये व्यावसायिक तसेच व्यक्तिगत आयुष्यात खटके उडत आहेत. त्यांच्यातील हा वाद आता विकोपाला गेलाय. या सर्व प्रकरणावर शशांक आणि तेजश्री यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या दोघांनीही अलीकडेच रंगभूमीवर पदार्पण केले आहे. शशांक सध्या 'गोष्ट तशी गमतीची' या व्यावसायिक नाटकात दिसत आहे, तर तेजश्रीने 'कार्टी काळजात घुसली' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे.
एकंदरीतच 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील ट्रॅकप्रमाणेच शशांक आणि तेजश्रीच्या ख-या आयुष्यात वादंग निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. मात्र या दोघांसंदर्भातील ही बातमी नक्कीच त्यांच्या चाहत्यांना धक्का देणारी आहे.
दीड वर्षांपूर्वी झालेल्या या दोघांच्या लग्नाची मनोरंजन सृष्टीत खूप चर्चा झाली होती. आगंतूक पाहुण्यांची गर्दी वाढायला नको, म्हणून त्यांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह माणशी एक प्रवेशिका दिली होती. तसंच रिसेप्शनच्याही प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. या कारणामुळेही शशांक आणि तेजश्रीच्या लग्नाची खूप चर्चा होती. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि निवडक छायाचित्रांमध्ये बघा कसा रंगला होता श्री-जान्हवीचा खराखुरा लग्नसोहळा...