आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोहल्यावर चढण्यास पुन्हा एकदा सज्ज झाला \'श्री\', प्रियंकाशी झाला साखरपुडा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी ह्या घरची’ फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. नुकताच शशांकचा साखरपुडा पार पडला. अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबतचं त्याचं लग्न आणि नंतर झालेला घटस्फोट बराच गाजला होता. यानंतर प्रियंका ही त्याच्या आयुष्या आली. शशांकने काही दिवसांपुर्वी त्याच्या फेसबुक डिपीवर प्रियंकासोबतचा फोटो लावला होता. आता तर त्याच्या साखरपुड्याचा फोटो अभिनेत्री अमृता खानविलकरनं इंस्टाग्रामवर टाकलाय. यासोबतच शशांक केतकरनेसुध्दा " shashankketkarLove is the answer to all the questions! " क्यूट कॅप्शन टाकून त्यांचा दोघांचा फोटो इन्टाग्रामवर शेयर केलाय...
 
प्रियंका ही वकील आहे. प्रियंका ढवळे असे तिचे नाव आहे. शशांकने काही दिवसांपुर्वी फेसबुक डिपीला फोटो लावून तो रिलेशनशिपमध्ये आहे याचे संकेत दिले होते. प्रियंकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही दोघांचा फोटो असल्यामुळे यांचे नाते आहे हे कळाले होते. आज अमृताने साखरपुड्याचा फोटो टाकून ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
 
स्वप्नांच्या पलिकडले, होणार सून मी ह्या घरची, इथेच टाका तंबू यासारख्या मालिकांतून शशांकचा चेहरा घराघरात पोहचला होता. त्याचप्रमाणे शशांकचं ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. त्याने ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.
 
तेजश्री प्रधानसोबत थाटला होता शशांकने संसार...
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री-जान्हवी अर्थातच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान हे दोघे ख-या आयुष्याचे जोडीदार बनले होते. पडद्यावर रोमान्स करता-करता ख-या आयुष्यात त्यांच्यात प्रेमांकुर फुलला होता. अगदी फिल्मी स्टाईलने दोघांचे लग्नसुद्धा झाले. पण काही दिवसांतच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. लग्नाच्या वर्षभरातच शशांक-तेजश्रीचा संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. दोघांचे मार्ग विभक्त झाले. या दोघांचा घटस्फोटावर कायद्याची मोहर लागली नाही याची माहिती समोर आलेली नाही.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा शशांक आणि प्रियंकाचे काही खास फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...