आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांक केतकर सांगतोय, त्याच्या ‘मस्त पुणे’ क्रिकेट टीमची खेळण्याची स्ट्रॅटेजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांक केतकर उत्तम क्रिकेट खेळतो. हे त्याने आत्तापर्यंत झालेल्या कलाकरांच्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या मॅचेसमध्ये सिध्द केलंय. आणि म्हणूनच मराठी कलाकारांच्या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये यंदा पूण्याच्या टीमचा कॅप्टन शशांक केतकर आहे. पूण्याच्या टीमची पहिली लढत मुंबईच्या टीमसोबत असल्याने अर्थातच मुंबईकरांना हरवायचा चंग शशांकच्या ‘मस्त पूणे’ टीमने बांधलाय.
शशांक केतकर टीमच्या स्ट्रॅटेजीविषयी सांगतो, “आमची टीम खूप स्ट्राँग आहे. मागच्या दोन्ही क्रिकेट सिझनमध्ये टीमने चांगली कामगिरी केली होती. पण यंदा अजून जास्त चांगली कामगिरी करण्याचा मनोदय असणार आहे. फक्त मुंबईच्याच टीमसोबतची मॅच नाही, तर आमच्यासाठी प्रत्येक मॅच महत्वाची असणार आहे. सकारात्मकपणे शांतपणे प्रत्येक मॅच खेळायची हीच आमची स्ट्रॅटेजी असणार आहे. टीममध्ये मुलं-मुली दोन्ही आहेत. प्रत्येकाची क्रिकेटमधली एक स्पेशालिटी आहे. कोणी फिल्डींगमध्ये चांगलं आहे. तर कोणी बॅटिंगमध्ये, तर कोणी बॉलिंगमध्ये चांगलं आहे. त्यामुळे खेळताना कोणी काय करायचं हे आधीच ठरलंय.”
शशांक पूढे सांगतो,“कोणाविरूध्द कोण मॅच खेळतंय, ह्यापेक्षाही नेहमीच्या रूटीनमधून ह्या तीन दिवसांच्या क्रिकेट लीगमूळे एक छान ब्रेक असेल. एकमेकांसोबत कामशिवाय असा वेळ आम्हांला एरवी कुठे घालवता येतो. त्यामूळे सहकलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारायला मिळणार आहेत, ह्याचाच जास्त आनंद आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शशांक केतकर आणि आरोह वेलणकर सांगतोय मस्त पूणे टीमच्या स्ट्रॅटेजीविषयी...
(फोटो - अजित रेडेकर)
बातम्या आणखी आहेत...