आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांकच्या आयुष्यात आलेली ही नवीन तरुणी कोण? तिच्यासाठी चक्क् त्याने गायले गाणेही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया ऍक्टिव्ह राहताना दिसत असतो आणि अभिनेते तरी ह्यापासून मागे का राहतील? सोशल मीडियावर सिनेअभिनेते आणि अभिनेत्री आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अपडेट आपल्या चाहत्यांना देत असतात. 'होणार सून मी ह्या घरची' मध्ये सर्वांच्या घराघरात पोहचलेला शशांक केतकर आजकाल जास्तच चर्चेत दिसत आहे ते म्हणजे त्याच्या सोशल मीडिया च्या पोस्ट वरून. त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर सध्या होताना एक फोटो वायरल होताना दिसत आहे , त्यात तो त्या मुलीसोबत एक रँडम पोज देताना दिसत आहे. व्हॅनिटी व्हॅन जवळ काढलेला हा फोटो सध्या खूप नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. अखेर ही मुलगी आहे कोण ?
 
शशांक सोबत झळकणारा हा सुंदर चेहरा आहे अभिनेत्री रीना अग्रवालचा. टेलिव्हिजन मधून आपल्या करियर ची सुरुवात करणारी रीना हिला नेहमीच दमदार अश्या भूमिका मिळत आल्या मग तो क्या मस्त है लाईफ मधील रिया असो , वा एजन्ट राघव मधील डॉक्टर आरती ची भूमिका असो; प्रत्येक पैलू मध्ये रीना अतिशय वेगळीच दिसत आली आहे . रीना ने बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपट केलेले आहे , मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान"च्या  तलाश  पासून मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच  सोनाली कुलकर्णी च्या 'अजिंठा' ह्या चित्रपटांमध्ये रिना ला अभिनयाची संधी मिळाली.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शशांक केतकरचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...