आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयासोबतच बिझनेसमनही आहे शशांक केतकर, पुण्यात आहे 'आईच्या गावात' हॉटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता शशांक केतकर आज गर्लफ्रेंडबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. प्रियांका ढवळे असे शशांकच्या पत्नीचे नाव असून ती मुळची डोंबिवलीची आहे. अभिनयाच्या जोरावर शशांकने छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्याकडे मजल मारली आणि तिथेही तो यशस्वी ठरला. शशांक सध्या नाटकांमध्येही काम करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का शशांक एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक बिझनेसमनही आहे. पुण्यामध्ये आहे शशांकचे हॉटेल आईच्या गावात..  
 
होय अभिनयासोबतच शशांकची हॉटेल इंडस्ट्रीत एन्ट्री झाली आहे. गेल्यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी शशांकने पुण्यात स्वतःचे एक हॉटेल सुरु केले आहे. यावर्षी 11 ऑक्टोबर रोजी त्याच्या या हॉटेलची वर्षपूर्ती आहे. 'आईच्या गावात' असे अतिशय हटके नाव शशांकच्या हॉटेलचे आहे. तरुणाईला आकर्षित करणारे नाव मला हवे होते. येथे बसलेली तरुण मंडळी जेव्हा त्यांच्या मित्रांना आईच्या गावात बसलोय, असे सांगतात, तेव्हा आपल्या आईच्या गावाला गेल्याची भावना मनात येते, असे शशांक सांगतो. शशांकने या हॉटेलचे इंटेरिअर अगदी हटके पद्धतीने केले आहे. एका भींतीवर त्याने कार्टुन्सच्या रुपात देखावे सादर केले आहेत. 

स्नॅक्ससोबतच जेवणाची व्यवस्था त्याच्या या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. सकाळी साडे तीनशे आणि संध्याकाळी दीडशे चपात्या या हॉटेलमध्ये तयार होतात. शिवाय रक्षाबंधनाला नारळी भात आणि गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदक हे यावर्षीचे हॉटेलचे वैशिष्ट्य ठरले. शुद्धा शाकाहारी पदार्थ शशांकच्या हॉटेलमध्ये मिळतात. विशेष म्हणजे शशांक स्वतः एक उत्कृष्ट कुक आहे. नुडल्स आणि मोमोज ही त्याची स्पेशालिटी असून तो डोसेसुद्धा उत्तम बनवतो.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते शशांकच्या हॉटेलचे ओपनिंग 2016 साली झाले होते. 

 

यानिमित्ताने पाहुयात, शशांकच्या 'आईच्या गावात'ची खास झलक छायाचित्रांमध्ये..

बातम्या आणखी आहेत...