आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashank Ketkar\'s First Tv Serial Bid Adieu, Shashank Becomes Nostalgic

शशांक केतकर म्हणतोय,’चुकलं माकलं असेल तर माफ करा, लोभ असावा ही विनंती’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अडीच वर्षांपूर्वी शशांक केतकर हे नाव महाराष्ट्राला माहितही नव्हतं. पण ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका सुरू झाल्यावर अल्पावधीतच शशांकने लाखों तरूणींच्या मनावर राज्य करायला सुरूवात केली. गेलं अडीच वर्ष ह्या ‘चॉकलेट बॉय’ला त्याच्या पहिल्याच मालिकेने प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळालं. मालिका संपताना शेवटच्या दिवशी शशांक आपल्या सहकलावंतांशी गप्पा मारण्यात रंगला होता. अधूनमधून हास्यविनोद चालू होते. त्यातच शशांकच्या हातात कॅमेरा लागला आणि त्याने शेवटच्या दिवशीच्या काही आठवणी कॅमे-यात बंदिस्त करायला सुरूवात केली.
मालिका संपल्यावर जसं शशंकाच्या चाहत्यांना दु:खं होतंय. तसंच शशांकलाही वाईट वाटतंय तो म्हणतो, “प्रेक्षकांनी जे आमच्यावर अमाप प्रेम केलंय. त्यांच्या प्रेमाचं ऋण फेडणं अशक्यच आहे. पण त्यांच्या प्रेमाची जाण ठेवून आता इथून पूढे करीयरचा प्रवास सुरू ठेवणार आहे. प्रत्येक माणसाकडून आणि कलावंताकडून चूका होतातच. माझ्याकडून गेल्या अडीच वर्षांत जर काही चूका झाल्या असतील. तर दिव्यमराठीच्या माध्यमातून मी प्रेक्षकांची माफी मागतो.”
शशांक गप्पा मारताना नॉस्टेलजिक होत म्हणाला, “माझी खरं तर ही पहिली मालिका. ती करताना एवढी प्रसिध्दी मिळेल ह्याचा अंदाज नव्हता. प्रेक्षकांनी जसा कौतुकाचा वर्षाव केला, तशी टिकाही केली. ही असली मालिका कशासाठी सुरू आहे? वगैरे प्रश्न ही विचारले. कदाचित काहींना आमची मालिका आवडली किंवा पटली नसेल. त्यांच्या जगण्याच्या व्याख्येत ती बसली नसेल. त्यांना आमची खूप चीड आली असेल. पण १०० पैकी ९५ लोकं जर ही मालिका पाहत असतील, तर निर्माती संस्था आणि वाहिनीने ही मालिका सुरू ठेवणं साहाजिक होतं. असो, टिकाकरांवर माझा रोष नाही. शेवटी भरलेल्या झाडालाच लोकं दगड मारतात ना.”
अडीच वर्ष ही मालिका का चालली हे सांगताना शशांक पूढे म्हणतो, “उगीच प्रॉपर्टीवर चर्चा, त्याचा बडेजाव अशा गोष्टींवर ही मालिका नव्हती. ह्यातल्या प्रत्येक पात्राशी प्रेक्षक आपलं नातं सांगू शकत होते. त्यांच्या जीवनाशी मिळती-जुळती ही पात्र होती. त्यामुळे ती जवळची वाटली. प्रत्येकाला ही आपल्या घरातलीच गोष्ट वाटली. मालिकाविश्वात त्यावेळी हा हवाहवासा बदल होता. मनोरंजनाशिवाय मालिकेने समाजप्रबोघनही केलं. सीएनजी लावा, पेपरचा अपव्यय टाळा, चामडं न वापरणं, प्राण्यांवर प्रेम करा, किंवा दत्तक मुलं ह्या आणि अशा पध्दतीचे सामाजिक संदेश देण्याचं काम मालिकेनं वेळोवेळी केलंय.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मालिका संपल्यावर काय करणार शशांक