आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता शशांक केतकरच्या \'आईच्या गावात\' गेला आहात का कधी तुम्ही? नाही... तर मग चला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांक केतकर हे नाव आता सगळ्यांच्याच परिचयाचे झाले आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून श्रीच्या रुपात शशांक घराघरांत पोहोचला. तर आपल्या हॅण्डसम लूकने तो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. छोट्या पडद्यानंतर आता शशांकचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले आहे. त्याचा वन वे तिकिट हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला, तर आता भगवत गीता या आगामी चित्रपटात अभिनेत्री सायली संजीवसोबत तो झळकणार आहे. शिवाय रंगभूमीवर त्याचे गोष्ट तशी गंमतीची हे नाटक सुरु आहे. अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर झालेल्या शशांकच्या साइड बिझनेसविषयी तुम्हाला ठाऊक आहे का?  वकिल आहे शशांक केतकरीची भावी पत्नी, बघा प्रियांकासोबतची क्यूट केमिस्ट्री दाखवणारे Photos

होय अभिनयासोबतच शशांकची हॉटेल इंडस्ट्रीत एन्ट्री झाली आहे. गेल्यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी शशांकने पुण्यात स्वतःचे एक हॉटेल सुरु केले आहे. यावर्षी 11 ऑक्टोबर रोजी त्याच्या या हॉटेलची वर्षपूर्ती आहे.  'आईच्या गावात' असे अतिशय हटके नाव शशांकच्या हॉटेलचे आहे. तरुणाईला आकर्षित करणारे नाव मला हवे होते. येथे बसलेली तरुण मंडळी जेव्हा त्यांच्या मित्रांना आईच्या गावात बसलोय, असे सांगतात, तेव्हा आपल्या आईच्या गावाला गेल्याची भावना मनात येते, असे शशांक सांगतो. शशांकने या हॉटेलचे इंटेरिअर अगदी हटके पद्धतीने केले आहे. एका भींतीवर त्याने कार्टुन्सच्या रुपात देखावे सादर केले आहेत. B'day: तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे हा हॅण्डसम अॅक्टर, पहिल्यांदाच बघा बालपणीचे Pics

स्नॅक्ससोबतच जेवणाची व्यवस्था त्याच्या या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. सकाळी साडे तीनशे आणि संध्याकाळी दीडशे चपात्या या हॉटेलमध्ये तयार होतात.  शिवाय रक्षाबंधनाला नारळी भात आणि गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदक हे यावर्षीचे हॉटेलचे वैशिष्ट्य ठरले. शुद्धा शाकाहारी पदार्थ शशांकच्या हॉटेलमध्ये मिळतात. विशेष म्हणजे शशांक स्वतः एक उत्कृष्ट कुक आहे. नुडल्स आणि मोमज ही त्याची स्पेशालिटी असून तो डोसेसुद्धा उत्तम बनवतो. Happy Engineers Day : मराठी इंडस्ट्रीतील या इंजिनिअर अभिनेत्यांविषयी तुम्हाला ठाऊक आहे का?

 अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते शशांकच्या हॉटेलचे ओपनिंग गेल्यावर्षी झाले होते. आज ((15 सप्टेंबर) शशांकचा 32 वा वाढदिवस आहे. 2nd Marriage : आता दुसरा संसार थाटणार शशांक, हे 6 फेमस मराठी सेलेब्स चढले दुस-यांदा बोहल्यावर
 
यानिमित्ताने पाहुयात, शशांकच्या 'आईच्या गावात'ची खास झलक छायाचित्रांमध्ये...   
बातम्या आणखी आहेत...