आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'श्री\'च्या खासगी आयुष्यात आली \'मिस्ट्री गर्ल\', वाचा कोण आहे ती... चर्चेला उधाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. मात्र यावेळी एखाद्या मालिकेमुळे नव्हे तर खासगी आयुष्यातील एका खास घटनेमुळे शशांकच्या नावाची चर्चा होतेय. तीन ते चार दिवसांपूर्वी शशांकने त्याच्या फेसबुकच्या डीपीला एका मैत्रिणीसोबतचा फोटो लावला आणि त्यानंतर अचानक चर्चांना उधाण आले. या फोटोनंतर प्रेक्षकांच्या लाडक्या श्रीला नवीन जान्हवी गवसल्याची चर्चा सुरु झाली. शशांक आणि त्याच्या मैत्रिणीच्या या फोटोलो हजारो लाईक्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. विशेष म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या दोघांच्या फोटोला ''Muahhhhh u 2'' अशी प्रेमळ कमेंटसुद्धा केली आहे. तर शशांकच्या चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे शशांक जुने सगळे विसरुन नव्याने आयुष्याची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
 
कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'? 
शशांकने नवीन रिलेशनशिपविषयी सार्वजिकरित्या कबुली दिलेली नसली तरी फोटोमधली ही 'मिस्ट्री गर्ल' कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण शशांकने फोटो शेअर करताना या तरुणीविषयीची कुठलीही माहिती दिली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, फोटोमधली 'ती' मुलगी डोंबिवलीची असून प्रियांका ढवळे असे तिचे नाव आहे. तिला याबाबत विचारले असता 'मी आणि शशांक याबाबत काहीही बोलू इच्छित नाही' असे तिने स्पष्ट केले.  
 
प्रियांकाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइललासुद्धा शशांकसोबतचा डीपी 
प्रियांका ढवळे हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटलादेखील तिने शशांकसोबतचा डीपी लावला आहे. इतकेच नाही तर शशांकची धाकटी बहीण दीक्षा केतकर हिनेसुद्धा प्रियांकासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे प्रियांका शशांकच्या कुटुंबीयांच्या खूप जवळ असल्याचे दिसून येते. 
 
तेजश्री प्रधानसोबत थाटला होता शशांकने संसार... 
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री-जान्हवी अर्थातच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान हे दोघे ख-या आयुष्याचे जोडीदार बनले होते. पडद्यावर रोमान्स करता-करता ख-या आयुष्यात त्यांच्यात प्रेमांकुर फुलला होता. अगदी फिल्मी स्टाईलने दोघांचे लग्नसुद्धा झाले. पण काही दिवसांतच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. लग्नाच्या वर्षभरातच शशांक-तेजश्रीचा संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. दोघांचे मार्ग विभक्त झाले. या दोघांचा घटस्फोटावर कायद्याची मोहर लागली नाही याची माहिती समोर आलेली नाही.

मात्र नेमके या दोघांमध्ये काय झाले होते, का दोघांनी घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेतला, याविषयी वाचा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...