आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'छैया छैया' गाण्यात मलायकाच्या जागी होती ही मराठमोळी अभिनेत्री, वाढलेल्या वजनामुळे झाली हकालपट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. नव्वदीच्या दशकातील एक बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून शिल्पाची ओळख आजही आहे.  पूर्वाश्रमीची मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर दोघेही सख्ख्या बहिणी आहेत. किशन कन्हैयापासून मिळाले यश..

 

किशन कन्हैयामधून मिळाले यश..
शिल्पा शिरोडकरने अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या किशन कन्हैया या चित्रपटातून ओळख निर्माण केली. 1989 साली मिथून चक्रवर्ती आणि रेखा यांचा चित्रपट 'भ्रष्टाचार' शिल्पाचा पहिला चित्रपट होता पण तिला प्रसिद्धी मिळाली ते किशन कन्हैयामधून. या चित्रपटानंतर शिल्पाने कधीही मागे वळून पाहिले नाही. 

 

वाढलेल्या वजनामुळे करिअरवर झाला परिणाम..
एकिकडे शिल्पाला चांगलेचांगले ऑफर्स येत होत्या तर दुसरीकडे तिचे वाढलेले वजन तिच्या करिअरच्या आड येत होते. पण शिल्पाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. फार कमी लोकांना माहित आहे की, शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांच्या दिल से या चित्रपटातील लोकप्रिय छैया छैया गाणे अगोदर शिल्पाच्या नावावर होते. मलायकाच्या जागी शिल्पा या गाण्यात ठुमके लावणार होती पण शिल्पाच्या वजनामुळे तिच्या हातातून ती संधी गेली. 
 
13 वर्षांच्या ब्रेकनंतर परतली शिल्पा..
शिल्पाने 2000 सालापर्यंत चित्रपटात काम केले आणि त्यानंतर अॅक्टींगमधून ब्रेक घेतला. याचवर्षी तिने लग्नही केले. तब्बल 13 वर्षानंतर शिल्पा शिरोडकरने 2013 साली टीव्हीद्वारे पुनपदार्पण केले. शिल्पाला 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेत प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिल्पा शिरोडकरचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...