कंदर : दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या सिनेमाची क्रेझ अद्यापही मुळीच कमी झालेली नाही. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु असून ८५ कोटींचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे. लवकरच हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशी चिन्ह दिसत आहेत. नवोदितांसोबत महाराष्ट्रातील अतिशय छोट्या गावात शूट झालेला हा सिनेमा... मात्र सिनेमातील कलाकारांचा वावर आणि ठिकाणे डोळे दिपवणारी आहेत. पुणे आणि हैदराबादसह पश्चिम महाराष्ट्रातील केम, वांगी, चिखलठाणा, जेऊर, शेळगाव या छोट्या छोट्या गावांत सिनेमाचे शूटिंग झाले. या सिनेमातील पाटील अर्थातच आर्चीच्या तात्यांचा एक टोलेजंग वाडा दाखवण्यात आला आहे.
तात्यांनी त्यांची लेक आर्ची उर्फ अर्चनाच्या नावावर बंगल्याचे नाव ठेवलेले असते. दिग्दर्शक नागराज मंजुळेंना या बंगल्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही. याच वाड्यात 'झिंगाट' या गाण्याचे चित्रीकरण पार पडले आहे. हा बंगला कंदर (ता. करमाळा) या गावी आहे. येथील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भास्कर भांगे यांच्या मालकीचा आहे.
22 दिवस चालले शूटिंग...
जवळजवळ 22 दिवस या बंगल्यात सिनेमाचे शूटिंग झाले. त्यापैकी तीन दिवस 'झिंग झिंग झिंगाट' हे गाणे चित्रीत करण्यात आले. वाड्याच्या समोर मोठे पटांगण असल्यामुळे गाण्याच्या चित्रीकरणासाठी आलेल्या जवळजवळ एक हजार गावक-यांच्या खाण्यापिण्याची सोय येथे करता आली. शूटिंग आटोपल्यानंतर सिनेमाची संपूर्ण टीम करमाळ्यात वास्तव्याला जात असे. या गाण्यासाठी नागराज यांना गर्दी हवी होती. त्यामुळे अकलुज येथील रिंकू राजगुरुच्या कॉलनीतील बरेचसे लोक या गाण्यात सहभागी झाले. यासाठी खास बस करुन पूर्ण कॉलनीतील लोक दररोज अकलूजहून कंदरला जात असे. या गाण्यात रिंकूच्या आईवडिलांसह आजीही झळकली आहे. रात्री सातच्या सुमारास शूटिंगला सुरुवात व्हायची आणि पहाटे पाच वाजेपर्यंत हे शूटिंग चालायचे.
गाण्यासाठी अगदी नवरीप्रमाणे हा बंगला सजवण्यात आला होता. त्यावेळी शूटिंग सेटवर कसा माहोल असायचा याची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, शूटिंग सेटवर कसा होता त्यावेळी नजारा...