आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shree Purchase Laxmihaar For Janhavi As A Diwali Padwa Gift

PHOTOS: श्री-जान्हवीच्या दिवाळी पाडव्याचा गोडवा, श्रीने दिला जान्हवीला लक्ष्मीहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये श्री-जान्हवीने पाडवा साजरा केलाय. नेहमीच श्री-जान्हवी प्रत्येक सणाचं अवडंबर न करता प्रथेप्रमाणे आणि साधेपणे सण साजरा करण्यावर भर देतात. तसाच पाडवाही साजरा झालाय. जान्हवीने श्रीला ओवाळलंय. आणि ओवाळल्यावर तिला एक सरप्राइज गिफ्ट मिळालंय. श्रीने जान्हवीला लक्ष्मीहार दिलाय.
तेजश्री प्रधान म्हणते, “जान्हवी ही एक आयडियल सून आणि आयडियल बायको आहे. तिला महागडं गिफ्टचं आकर्षण नाही. तिला सण-समारंभ साधेपणाने आपल्या सासू आणि नव-यासोबत साजरे करायला आवडतात. त्यामूळे तिला श्री काय गिफ्ट देणार ह्याविषयीही विशेष उत्सुकता नाही. हो, पण नव-याने गिफ्ट दिल्यावर तिला त्या गिफ्टचं कौतुक मात्र खूप आहे.”
तेजश्री पूढे सांगते,“जान्हवीच्या मृदू स्वभावामूळेच अनेकजणांना आपली बायको किंवा आपली सून सुध्दा जान्हवीसारखीच असावी, असं वाटतं. पण मला असं वाटतं, गोड स्वभावाची पत्नी किंवा सून तेव्हाच मिळू शकते, जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीवर श्रीसारखं निस्वार्थ प्रेम कराल. आणि जान्हवीच्या सासूबाईंसारखी निखळ माया कराल.जेव्हापासून जान्हवी गरोदर आहे, तेव्हा खाली वाकून नमस्कार करतानाही नेहमी श्री आपल्या सर्व आईंना म्हणतो, मी, जान्हवी आणि माझ्या दोघांच्यावतीने नमस्कार करतोय. हा समजूतदारपणा जेव्हा प्रत्येक पतीमध्ये येईल, तेव्हा त्याची सहचारिणीसुध्दा नक्कीच जान्हवीसारखी समजूतदार होईल, यात शंका नाही.”
शशांक केतकर सांगतो, “श्री हा नेहमीच आपली कर्तव्य व्यवस्थित सांभाळणारा नवरा आणि मुलगा आहे. वर्षातल्या प्रत्येक दिवशी तो जान्हवीवर खूप प्रेम करतो. हे त्याने आत्तापर्यंत दाखवलंच आहे. सणांना फक्त उत्सव न बनवता, त्यांना संस्कार मानणा-यातलं गोखले कुटूंब आहे. आणि पाडवाही तसाच साजरा झालाय.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसा साजरा केला श्री-जान्हवीने दिवाळी पाडवा