आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'पाऊस हा पहिल्या प्रीतीचा...\' म्हणत मयुरी देशमुख पडली प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मानसी अर्थातच अभिनेत्री मयुरी देशमुख हिचे वेगळे रुप आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. 'पाऊस हा पहिल्या प्रीतीचा...' असे म्हणत मयुरी चक्क प्रेमात पडली आहे. रिचमंड एंटरटेन्मेंटच्या नवीन व्हिडिओत मयुरी प्रेमात आकंठ बुडालेली दिसतेय.
 
विशेष म्हणजे मयुरीसाठी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने गाणे स्वरबद्ध केले आहे. पहिल्याच व्हिडिओत श्रेया घोषालचा आवाज लाभल्याने मयुरी अतिशय आनंदी आहे. तिने फेसबुक अकाउंटवर गाण्याचा व्हिडिओ शेअर करुन लिहिले,  "It's out!!!  All smiles when it's 'Shreya Ghoshal' singing ❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️❤️️"

किरण विकास खोत हे या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहे. या व्हिडिओत मयुरीचा दिलखेचक अंदाज लक्ष वेधून घेतोय. 

पाहुयात, मयुरी देशमुखचा हा खास व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...