आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Shreyas Talpade And Jitendra Joshi Celebrate Birthday Together

श्रेयस-जितेंद्रने एकत्र सेलिब्रेट केला बर्थडे, पाहा पार्टीतील INSIDE PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांच्या बर्थडे सेलिब्रेशनची खास छायाचित्रे)

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी या दोन अभिनेत्यांमध्ये एक खास साम्य आहे. ते म्हणजे हे दोन्ही स्टार्स एकाच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतात. 27 जानेवारी रोजी या दोघांनी आपला वाढदिवस एकत्रितरित्या सेलिब्रेट केला.
विशेष म्हणजे हे दोन स्टार्स लवकरच आगामी 'बाजी' या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बाजीच्या टीमने एक जंगी बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रिया बापट, उमेश कामत, श्रीरंग गोडबोले, महेश कोठारे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, सचिन पिळगावकर, गिरीजा ओक-गोडबोले, सुमीत राघवन, नेहा पेंडसे, सुशांत शेलार यांच्यासह बरेच सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते.
या पार्टीतील धमालमस्तीची झलक तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...